15 January 2025 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण | अर्णब गोस्वामींसह तिघांना न्यायालयाचे समन्स

Republic Tv editor Arnab Goswami, Alibagh Court, Anway Naik Suicide Case

मुंबई, १६ डिसेंबर: अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तीनही आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. तिघांनाही येत्या ७ जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्यासाठी अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी समन्स बजावले आहे. २०१८ मध्ये अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळच्या कावीर येथील आपल्या घरी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटवरून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

रायगड पोलिसांनी २ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले. सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांची जामिनावर सुटका केली. मात्र या गुन्ह्यात रायगड पोलिसांनी अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरुद्ध अलिबाग न्यायालयात १८०० पानी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. त्यावर बुधवारी सुनावणी झाली.

दरम्यान, फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Republic TV Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली होती. फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली आहे. Republic TV Fake TRP scam CEO Vikas Khanchandani arrested by Mumbai Police.

बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली होती.

 

News English Summary: Arnab Goswami’s troubles are likely to escalate again. According to the architect, all the three accused in the Naik suicide case, including Republic TV editor Arnab Goswami, will have to appear in Alibag court. All three have been summoned by the Alibag Chief Magistrate to appear in court on January 7. In 2018, Naik committed suicide at his home in Kavir near Alibag. A case was registered at Alibag police station on the suicide note written by him.

News English Title: Republic Tv editor Arnab Goswami including others two summoned by Alibagh Court over Anway Naik Suicide Case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x