23 February 2025 4:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

TRP घोटाळा | अर्णब गोस्वामी आणि बार्कच्या सीईओमधील चॅट व्हायरल झाल्याने खळबळ

Republic TV, Editor in Chief Arnab Goswami, TRP scam, chat leaked

मुंबई, २५ जानेवारी: ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटने खळबळ माजली आहे आणि त्यामुळे अर्णब गीस्वामी यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण TRP घोटाळ्यासंदर्भातील व्हाट्सअँप चॅट समाज माध्यमांवर सार्वजनिक झालं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चॅट रेटिंग एजन्सी बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यादरम्यानच असून, त्यातील विषय हा TRP घोटाळ्यासंबंधित असल्याने अर्णब गोस्वामी पूर्णपणे फसल्याची चर्चा आहे.

प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलचे स्क्रीनशॉट शेअर करत असे लिहिले आहे की, हे बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यात झालेल्या चॅटचे व्हायरल झालेले फोटो आहेत. या फोटोंवरून अर्णब गोस्वामी यांचं संपूर्ण काटकारस्थान उघड होते. प्रशांत भूषण यांनी यासंदर्भात पुढे असे लिहिले आहे की, कशाप्रकारे मीडिया आणि आपल्या पदाचा गैरवापर केला गेला आहे. कायद्याला धरून चालणाऱ्या कोणत्याही देशात अनेक वर्षे तुरुंगात खडी फोडण्यासाठी इतके पुरावे खूप आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे सीईओ यांच्यातील WhatsApp चॅट लीक झालेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ट्विटर युजर्स अर्णब गोस्वामी हॅशटॅगसह कथित चॅट शेअर करत प्रतिक्रिया देत आहेत. प्रशांत भूषण यांच्या याच ट्वीटवर कमेंट करताना पत्रकार मीना दास नारायण यांनी लिहिले आहे की, आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू ? एक कारण सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू. प्रशांत भूषण यांच्या या ट्वीटवर परवेज खान या युजरने या ब्रेकींग न्यूजला कोणतंही मीडिया हाऊस का कव्हर करत नाहीय असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान रिपब्लिक वाहिनीचे संस्थापक-संपादक अर्णव गोस्वामी यांनी सहा वेळा भेटून पैसे दिल्याचे बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांनी म्हटले आहे. यातील तीन वेळा मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये झालेल्या भेटीचा तपशील त्यांनी पोलिसांना दिला आहे. या ठिकाणी झालेल्या आर्थिक व्यवहाराचे पुरावेदेखील पोलिसांच्या हाती लागल्याने अर्णव यांच्या अडचणी आधीच वाढल्या होत्या. ‘रिपब्लिक’कडून हॉलिडे पॅकेज; तसेच रोख मोबदला दासगुप्ता यांना मिळाला असून, यातून त्यांनी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे.

 

News English Summary: A recent tweet by senior lawyer Prashant Bhushan has caused a stir and is likely to sink Arnab Giswami. Because the WhatsApp chat regarding the TRP scam has become public on social media. The shocking thing is that this chat is between the CEO of the rating agency Bark and Arnab Goswami, and the subject matter is the discussion that Arnab Goswami has completely failed as it is related to the TRP scam.

News English Title: Republic TV editor in Chief Arnab Goswami TRP scam chat leaked news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x