14 January 2025 1:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

कंगनाच्या बंगल्याबाहेर लोकांना पैसे देऊन चिथावणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकाराला अटकपूर्व जामीन

Republic TV Journalist, Kangana ranaut bungalow, Mumbai Police

मुंबई, १७ ऑक्टोबर : रिपब्लिकन टीव्ही या वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रदीप भंडारी यांच्यावर खार पोलिसांनी आयपीसी कलम ३५३ (मारहाण करणे), १८८ आणि बॉम्बे पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. आर.एम. सदरानी यांनी भंडारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

कंगनाच्या बंगल्यावर कारवाई सुरू असताना भंडारी यांनी १५-२० लोकांना पैसे देऊन चिथावले, सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि प्रशासनाविरोधात घोषणा देण्यास सांगितले. त्यानुसार, जमावाने घोषणाबाजीसह पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला, असे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयाला सांगितले. तर भंडारी यांच्या वकिलांनी सांगितले की, भंडारी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केली नाही. त्यामुळे आयपीसी कलम ३५३ लागू होत नाही. पोलिसांना कर्तव्य बजावण्यापासून अडविण्यासाठी कोणत्याही प्रकारची ताकद लावण्यात आली किंवा मनुष्यबळाचा वापर करण्यात आला, असा उल्लेख एफआयआरमध्ये नाही. पोलिसांची तक्रार गर्दीविरोधात आहे. तसेच घोषणा देण्यासाठी गर्दीला पैसे देणे, हा इथे गुन्हा नाहीच, असे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने भंडारी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्याबाबत अधिकृत माहिती दिली होती.

ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मुंबई पोलीस आयुक्तांची प्रतीमा मलिन करण्यासाठी शिस्तबद्ध कँपेन चालविण्यात आलं होतं. विशेष त्यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर केला आणि मुंबई पोलीस दलाला बदनाम करण्याची मोठी योजना सातत्याने राबवली गेल्याच पाहायला मिळालं होतं. सदर प्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत अनेक सोशल मीडिया अकाऊंट आणि बनावट अकाऊंटवर गुन्हे दाखल केले गेले, अशी माहिती रश्मी करंदीकर यांनी दिली होती आणि तिथेच डिजिटल गुन्हेगारांचे धाबे दणाणले.

 

News English Summary: Republic TV’s consulting editor and reporter Pradeep Bhandari was on Thursday granted anticipatory bail by a sessions court in a case filed against him by the Khar police in connection with the disturbance created by a mob that included Bhandari outside actor Kangana Ranaut’s office in Bandra last month during its demolition. Additional Sessions Judge RM Sadrani while granting pre-arrest bail to the journalist directed that in the event of arrest he be released on executing a personal bond of Rs. 15,000 and a surety of the same amount and that the Khar police station be informed accordingly.

News English Title: Republic TV Journalist granted pre arrest bail accused of inciting people outside Kangana ranaut bungalow News updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x