मतदारांनो सावधान! काहीही घडवलं जाईल? निवडणुकीपूर्वी अयोध्येत साधूची हनुमान मंदिरात हत्या, मुस्लिम विषयाशी कोणताही संबंध नाही पण...
Sadhu Ram Sahare Das | लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. तत्पूर्वी देशभरातील विरोधकांनी आरोप करताना म्हटले आहेत की, देशात लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारीच भीषण घटना घडवून आणतील. त्यात अयोध्येत आतंकवादी हल्ला घडवून आणणं तसेच हिंदू-मुस्लिम दंगल घडेल अशा घटना घडवून आणल्या जातील अशी भीती आधीच व्यक्त केली आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही ठरला जाईल असे आरोप विरोधकांनी आधीच केले आहेत. आता अयोध्येतून एक धक्कादायक बातमी आली आहे. अयोध्येतील हनुमान मंदिरात एक साधूची हत्या करण्यात आली आहे. पण या घटनेचा मुस्लिम समाजाशी कोणताही संबंध नाही. परंतु, गोदी मीडिया या देशात कोणताही मुद्दा पेटवून भाजपाला मदत करत हे आता लपून राहिलेलं नाही. महाराष्ट्रातील पालघर घटना देखील अशी पेटविण्यात आली होती.
रामनगरी अयोध्येतील प्रसिद्ध हनुमानगढी मंदिरात एका साधूची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. साधू राम सहारे दास हे हनुमानगढीच्या बसंतिया पट्ट्यातील संत दरबल दास यांचे शिष्य होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
कौटुंबिक जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद
घटनेची माहिती मिळताच आयजी आणि एसएसपीसह इतर पोलिस अधिकारी हनुमानगड कॅम्पसमध्ये पोहोचले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. भिती, आंबेडकरनगर येथील सुमारे १० बिघा जमिनीच्या मालकीहक्कावरून हा खून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेच्या वेळी कॅम्पसमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, असे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर मंदिर परिसरात राहणारा एक तरुण बेपत्ता आहे. त्याच्यावर खुनाचा संशय आहे. साधू राम सहारे दास हे हनुमानगढी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील एका खोलीत राहत होते. त्याच खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या घशावर खोल खुणा आढळून आल्या आहेत. पोलिसांबरोबरच फॉरेन्सिक पथकही या घटनेच्या तपासात गुंतले आहे.
News Title : Sadhu Ram Sahare Das of Hanumangarhi murdered in Ayodhya temple 19 October 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS