14 January 2025 12:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Saki Naka Rape Case | गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार - मुख्यमंत्री

Sakinaka Rape

मुंबई , ११ सप्टेंबर | मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.

Saki Naka Rape Case, गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार – Saki Naka Rape case will be run on fast track court said CM Uddhav Thackeray :

याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

दरम्यान, मुंबईतील साकिनाका परिसरात एका 30 वर्षाच्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत महिलेची प्रक़ृती चिंताजनक असल्याने तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज डॉक्टरांनी सदरील पीडित महिलेला मृत घोषित केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विशेष म्हणजे पीडित महिलेचा मृत्यू होण्यापूर्वी महापौरांनी संबंधित रुग्णालयाला भेट देत तीची विचारपूस केली. दरम्यान, महापौरांनी डॉक्टरांकडून उपचाराची माहित घेत रुग्णालयाच्या डीन विद्या ठाकूर यांच्याशी ही संवाद साधला होता. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी पीडित महिलेच्या आईशी संवाद साधत घटनेची माहिती घेतली होती.

पीडितेच्या आईने सांगितली हकिकत:
महापौर किशोरी पेढणेकर यांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिला त्या पुरुषांसोबत मागील 10 ते 12 वर्षापासून राहत होती. दरम्यान, त्या दोघांमध्ये भांडण व्हायचे. तो तीला प्रचंड मारहाण करायचा हे कळल्यावर स्थानिकांनी पोलिसांनी बोलावून घेतले होते. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत महिलेला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले होते अशी माहिती महापौर किशोरी पेढणेकर यांनी दिली आहे.

संपूर्ण प्रकरण काय?
साकिनाका येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, तिने शहरातील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान प्राण सोडले आहेत. ती 9 सप्टेंबरला साकीनाका परीसरातील खैरानी रोडवर बलात्कारानंतर बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. या घटनेत पीडित महिलेसोबत निर्भयासारखे व्यवहार झाल्याचे समोर आले होते.या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री तीन वाजता घडली होती. आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या खासगी अवयवात रॉड घुसवला होता. यामुळे पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी पीडित महिलेला खैरानी रस्त्यावरून उचलून आणले होते.

महिलेच्या खासगी अवयवात जखम
डॉक्टरांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या अंतर्गत भागात जखम झाली आहे. महिलेचे आॅपरेशन करण्यात आले असून तीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख मोहन चव्हाण अशी झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Saki Naka Rape case will be run on fast track court said CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x