22 February 2025 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Sakinaka Rape Case | साकीनाका बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांकडून 346 पानांचे आरोपपत्र दाखल

Sakinaka Rape Case Mumbai Police filed charge sheet of 346 pages

मुंबई, २९ सप्टेंबर | मुंबईसह देशभरात खळबळ उडववणाऱ्या साकीनाका बलात्कार (Sakinaka Rape Case) आणि हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 दिवसांत तपास पूर्ण करत आरोपपत्र दाखल केले आहे. 346 पानांच्या या आरोपपत्रात 77 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी हे आरोपपत्र दिंडोशी न्यायालयात दाखल केले आहे.

Mumbai Police has filed a charge sheet in the Sakinaka Rape Case and Murder case, which has caused a stir across the country, including Mumbai, after completing its investigation within 18 days. The 346-page charge sheet recorded the answers of 77 people :

साकीनाका येथे 32 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या बलात्काराची तुलना दिल्लीच्या ‘निर्भया’ प्रकरणाशी करण्यात आली. याप्रकरणी तत्काळ कारवाई करत पोलिसांनी काही तासांतच आरोपी मोहन चौहानला अटक केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेनंतर आश्वासन दिले होते की, पोलीस एका महिन्यात तपास पूर्ण करतील आणि दोषीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल. मुंबई पोलिसांनी 30 दिवसांऐवजी 18 दिवसांत तपास पूर्ण केला असून आरोपपत्र दाखल केले आहे.

पूर्वनियोजित नाही, आरोपींनी संतापाच्या भरात केला गुन्हा:
आरोपींनी रागाच्या भरात हे नृशंस कृत्य केल्याचे पोलिसांना त्यांच्या तपासात आढळले. पीडित महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. त्यांचे जवळचे नातेही होते. परंतु दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे आरोपी संतापला. घटनेपूर्वी आरोपीने महिलेला भेटण्याचा प्रयत्न केला. त्याने 25 दिवसांपूर्वी पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. बऱ्याच प्रतीक्षेनंतर जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा त्याने संतापाच्या भरात हे घृणास्पद कृत्य केले. या घृणास्पद कार्यात त्याने लोखंडी रॉडचाही वापर केला. पोलिसांनी आरोपपत्रात असे लिहिले आहे की, आरोपींनी असे मुद्दाम करण्याचा विचार केला नव्हता. त्याने जे केले आहे, त्याने रागाच्या भरात केले आहे. आतापर्यंत आरोपीच्या वतीने वकील पत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे आलेला नाही.

9-10 तारखेच्या मध्यरात्री 2.45 च्या सुमारास, 32 वर्षीय महिलेवर आरोपी मोहन चौहानने साकीनाका येथील खैराणी रोडजवळ बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने निर्दयीपणे महिलेला लोखंडी रॉडने मारले आणि रॉड गुप्तांगात घातला. 3 ते 3.15 च्या सुमारास जवळच्या एका कंपनीच्या चौकीदाराने पोलिसांना माहिती दिली. पोलीस तेथे पोहोचले आणि महिलेला रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता अतिरक्तस्त्रावामुळे पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Sakinaka Rape Case Mumbai Police filed charge sheet of 346 pages.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x