23 February 2025 4:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

समीत ठक्कर कोर्टापुढे हजर | पुन्हा मुंबई पोलिसांच्या कोठडीत | नेटीझनगिरी भोवली

Sameet Thakkar, BJP IT Cell, Nagpur Police, Mumbai Police

मुंबई, ३ ऑक्टोबर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री तथा युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह टिपणी करणाऱ्या समीत ठक्करला (Sameet Thakkar) न्यायालयाने ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. समीत ठक्करला गुजरातच्या राजकोटहून २४ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. त्याला आज न्यायालयापुढे पुन्हा हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने त्याला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बॉलिवूड कलाकार सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना त्याने थेट औरंगजेब तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पेंग्विनशी तुलना करणारे विवादित ट्विट केले होते. सदर प्रकरणी काही शिवसैनिकांच्या रीतसर तक्रारीवरून मुंबईत दोन आणि नागपुरात एक गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी हायकोर्टाने २० ऑक्टोबरला अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्याला लगेचच अटक करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यासंबंधित आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा ठपका समीत ठक्करवर (Sameet Thakkar) आहे.

 

News English Summary: Sameet Thakkar has been remanded in police custody till November 9 for making offensive remarks on social media against Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray and Environment Minister and youth leader Aditya Thackeray. Samit Thakkar was arrested on October 24 from Rajkot in Gujarat. He was produced before the court again today. The court has remanded him in police custody till November 9.

News English Title: Sameet Thakkar Sent To Mumbai Police Custody Till 9th November By A Court News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x