नवी मुंबईत स्वतःच्या माणसांमार्फत गजानन काळे पालिकेतील अधिकारी-कंत्राटदारांकडून लाखोंची वसुली करायचे - पत्नीचा आरोप
मुंबई, १३ ऑगस्ट | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच गंभीर आरोप करताना तक्रार दाखल केली आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या आणि अशा आदी कलमांखाली काळे यांच्या पत्नीकडून नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागील अनेक वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. मात्र आता गजानन काळेंवर पत्नी संजीवनी यांनी आणखी एक आरोप लावला आहे. गजानन काळे यांनी मनपा अधिकारी आणि कंत्राटदारांना लुबाडून पैसे कमावल्याचा गंभीर आरोप संजीवनी काळे यांनी केला आहे.
या सर्व प्रकारामुळे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांचे पाय आणखी खोलात जात आहे. मनसे शहराध्यक्षपदी नेमणूक झाल्यावर अक्षरशः बायकोच्या जीवावर उदरनिर्वाह करणारा साधा पदाधिकारी, आज करोडोंचा मालक कसा झालाय, असा सवाल संजीवनी यांनी उपस्थित केला आहे. सर्व मनपा अधिकारी कर्मचारी गजानन काळेचा खरा चेहरा लोकांसमोर आल्यामुळे का खुश आहेत, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
नवी मुंबई महापालिकेचे विभाग अधिकारी, कंत्राटदार यांना धमकावून त्यांच्याकडून लाखो रुपयांची वसुली शहराध्यक्ष गजानन काळे करत होता. प्रत्येक 2 ते 5 दिवसांनी गजानन काळेच्या घरी अनेक अधिकारी कंत्राटदार स्वतः किंवा त्यांच्या माणसांना पाठवून 2 ते 3 लाख रुपये देत होते” असा दावा संजीवनी काळे यांनी केला. कुठलाही व्यवसाय नसताना केवळ इस्टेट एजंट असल्याचे दाखवत, आज नवी मुंबईत 4 ते 5 घरे, 2 गाड्या आणि लाखोंची रोख रक्कम गजानन काळे यांनी कमावली. हा सगळा काळा पैसा असल्याची टीका संजीवनी काळे यांनी केली.
माध्यमांना दिलेली माहिती:
तो मला कायम बोलायचा की, तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे, तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केले, परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही, असं तो वारंवार बोलायला. तेव्हा आमच्या दोघांमध्ये या कारणांवरुन बऱ्याच वेळा भांडण झालं, जेव्हा जेव्हा भांडण होई त्यावेळी गजानन मला मारहाण करत असे. मग मी माहेरी जायचे. पुन्हा काही दिवस उटल्यानंतर गजानन मला फोन करुन माझी माफी मागायचा. पुन्हा असं होणार नाही, असं सांगून मला घरी आणायचा. पण काही दिवस सरले की त्याचं नाटक पुन्हा सुरु व्हायचं”, असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
त्याने अनेक महिलांशी संबंध होते. 2018 मध्ये एका महिला टीव्ही पत्रकारासोबत त्याचं अफेयर्स सुरु होतं. मी गजाननच्या मोबाईलमध्ये दोघांचे मेसेज पाहिले होते… त्यांना दोघांना एकत्र फिरताना, हॉटेलमध्ये जेवताना पाहिलं. त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये त्याचे एका महिला पत्रकारासोबत अनैतिक संबंध सुरु झाले. याबद्दल मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला मात्र, मी राजकारणी आहे, मला कुणी काही करु शकत नाही.. मला तू आणि मुलगा यांच्यापासून स्पेस हवी आहे…. तुझी आणि मुलाची मी यापुढे जबाबदारी घेणार नाही, असं म्हणत सातत्याने त्याने मला त्रास दिलाय”, असंही पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Sanjeevani Kale made more allegations on MNS Navi Mumbai leader Gajanan Kale news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या