8 January 2025 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
x

VIDEO | नवी मुंबई मनसेच्या आंदोलनाचं सत्य मांडलं | कामगारांच्या आंदोलनानंतर ठराविक रक्कम घेतली - संजीवनी काळे

MNS Gajanan Kale

नवी मुंबई, १४ ऑगस्ट | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच गंभीर आरोप करताना तक्रार दाखल केली आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या आणि अशा आदी कलमांखाली काळे यांच्या पत्नीकडून नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागील अनेक वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. मात्र आता गजानन काळेंवर पत्नी संजीवनी यांनी आणखी एक आरोप लावला आहे. गजानन काळे यांनी मनपा अधिकारी आणि कंत्राटदारांना लुबाडून पैसे कमावल्याचा गंभीर आरोप संजीवनी काळे यांनी केला आहे.

कामगारांच्या आंदोलनावर तोडपाण्याचा आरोप:
कामगारांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिकेविरोधात केलेल्या प्रत्येक आंदोलनानंतर ठराविक रकमेची तोडपाणी केली, असा गंभीर आरोप काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी केला आहे. तसेच अवघ्या 6 ते 7 वर्षात त्यांनी कोणताही उद्योग नसताना कोट्यवधींची संपत्ती कशी जमवली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याच बरोबर, यासंदर्भात आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असेही संजीवनी यांनी म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आंदोलने ही तोडपाण्याची असतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पत्रकारांशी बोलताना संजीवनी म्हणाल्या, राजकारणात एक वेगळा चेहरा असतो, खरा चेहरा दिसत नाही. राजकारणातला चेहरा मुखवटा असतो. गजानन काळे यांनी कामगारांचे प्रश्न मांडल्यानंतर प्रत्येक कामगाराकडून पैसा घेतला आहे. प्रत्येक कामगारांने एक अमाउंट त्यांना दिली आहे हे वास्तव देखील त्यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी प्रसार माध्यमांसमोर आणलं आहे.

चित्र वाघ यांचा राज्य सरकारला सवाल:
त्यानंतर ता संजीवनी काळेंनी पाठवलेला एक व्हिडीओ भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत संजीवनी काळे यांनी पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. “त्यावरुन हे काय चाललंय राज्यात?” असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना विचारला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Sanjeevani Kale revels fact behind MNS Gajanan Kale politics in Navi Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#GajananKale(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x