21 November 2024 9:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अर्णब यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका | शिवसेना राज्यसभेत मुद्दा उचलणार

Shiv Sena, MP Priyanka Chaturvedi, Arnab Goswami, WhatsApp chat

नवी दिल्ली, ०८ फेब्रुवारी: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याचा प्रस्तावावर राज्यसभेत आज चर्चा होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे, देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे.

दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सोमवारचा दिवस हा रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन गाजण्याची शक्यता दिसत आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या विषयासंदर्भात संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी करणारा प्रस्ताव सोमवारी सकाळी संसदेमध्ये सादर केल्याचे वृत्त टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलं आहे. अर्णब यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याचा दावा चतुर्वेदी यांनी केला आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार प्रियंका चतुर्वेदी यांनी लीक झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या मुद्द्यावरुन हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून यावरुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी करत सस्पेन्शन ऑफ बिझनेस नोटीस देण्याची मागणी केलीय. हे चॅट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे उल्लंघन आहे असंही प्रियंका यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Monday is likely to be the day of the budget session of Parliament, according to Republic TV editor Arnab Goswami’s WhatsApp chat. Shiv Sena MP Priyanka Chaturvedi has tabled a motion in Parliament on Monday morning seeking a discussion on the issue, Times Now reported. Chaturvedi has claimed that Arnab’s WhatsApp chat poses a threat to national security.

News English Title: Shiv Sena MP Priyanka Chaturvedi has tabled a motion in Parliament discussion on Arnab Goswami WhatsApp chat news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x