22 November 2024 9:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मनसुख यांचे शेवटचे लोकेशन वसई आणि मी वसईत राहतो या निष्कर्षाने आरोप म्हणजे...

Shivsena, Corporator Dhananjay Gawde, Manasukh Hiren case

वसई, ०९ मार्च: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

यावेळी त्यांनी हिरेन मनसुखच्या हत्येसाठी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक धनंजय गावडे हे जबाबदार असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर आता धनंजय गावडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आपली बाजू स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळे त्यांनी कोणावरही आरोप करताना विचार करावा. अशाप्रकारे कोणावरही आरोप करुन त्याला आयुष्यातून उठवून नका, अशी विनंती धनंजय गावडे यांनी केली.

मनसुख हिरेन प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. हिरेन मनसुख काळे की गोरे हेदेखील मला माहिती नाही. केवळ बिल्डर लॉबीला वाचवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना 12 दिवसांत माझ्यावर 10 खंडणीचे गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिल्यानंतर मी वसईत परतलो. हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणात आरोपपत्रातही माझे नाव नाही. परंतु, काही बिल्डरांना वाचवण्यासाठी मला याप्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोप धनंजय गावडे यांनी केला.

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडणे आणि हिरेन मनसुख प्रकरणात अनुक्रमे राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एसआयटीकडून तपास सुरु आहे. त्यांना तपास करुन द्यावा. हिरेन मनसुख यांचे लोकेशन केवळ वसईत सापडले म्हणून माझ्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असे धनंजय गावडे यांनी सांगितले.

 

News English Summary: Police officer Sachin Waze and former Shiv Sena Nalasopara corporator Dhananjay Gawde of Vasai-Virar Municipal Corporation have been blamed for the murder of Hiren Mansukh. Against this backdrop, Dhananjay Gawde now clarified his position while interacting with the media. The words of Devendra Fadnavis and Praveen Darekar have value. So they should think while accusing anyone. Dhananjay Gawde requested not to accuse anyone in this way and take him out of life.

News English Title: Shivsena former corporator Dhananjay Gawde reply after allegations in Manasukh Hiren case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x