मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कोणावरही अन्याय व सूडाने कारवाई करत नाहीत

मुंबई, ४ नोव्हेंबर: रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, न्यायालयाचे आदेश किंवा समन्स नसतानाही ही धडक कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून यानंतर करण्यात आला आहे.
तसेच अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. सध्या पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सदर प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं. जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई तसेच महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत किंवा सूड बुद्धीने देखील कारवाई करत नाहीत. त्यामुळे जर एखाद्याने खरंच गुन्हा केला असेल आणि त्यानंतर तो दडपला असेल आणि त्यासंदर्भातील काही तपासाचे, पुराव्यांचे धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती आले असतील तर पोलिसांनी कारवाई केली असेल. या सर्व प्रकरणाशी राज्य सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध असण्याचं कारण नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
तत्पूर्वी, रिपब्लिक टीव्हीने आम्हा सर्वांविरोधात बदनामीची जोरदार मोहीमच चालवली होती. प्रचंड प्रमाणावर खोटे आरोप केले होते. खोटे आरोप होत असतील तर त्याचाही तपास झाला पाहिजे असं आम्ही म्हटलं होतं. आता कोण काय म्हणालं याचं स्पष्टीकरण मी देण्यासाठी आलेलो नाही,” असं यावेळी ते म्हणाले.
News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut has also commented on the matter. Reacting to this, Raut said that work is done by law in Maharashtra. If we do something wrong, the law will not let us go. Mumbai and Maharashtra police never do injustice to anyone or even take revenge. Therefore, if a person has indeed committed a crime and then suppressed it and some of the relevant investigations and evidence have come to the notice of the investigating agency, then the police will have taken action.
News English Title: Shivsena MP Sanjay Raut statement after Arnab Goswami arrest by Raigad Police News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल