6 January 2025 4:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

जावयाची विकृती | सासूबाईंनी बायकोला माहेरी नेल्याचा रागातून सासूबाईंना पॉर्न व्हिडीओ पाठवले

pornographic video clips

हैदराबाद, ०२ जून | तेलंगना राज्यातील हैद्रबादमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका जावयाने अत्यंत धक्कादायक कृत्य केलं. बायकोला आपल्या मनाविरुद्ध माहेरी नेल्याचा राग जावयाने भयंकर पद्धतीने काढला असून त्याने स्वतःच्या सासूच्याच फोनवर अश्लील व्हिडीओ क्लीप पाठवल्या. यामुळे खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, आरोपी मोहम्मद अक्रम पाशा हैदराबादमधील ज्युबिली हिल्समधील कार्मिक नगर परिसरात एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. सात महिन्यांपूर्वी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी त्याचं लग्न झालं. मात्र लग्न झाल्यापासूनच क्षुल्लक कारणावरुन तो पत्नीला त्रास देत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिला माहेरी जाण्यासही त्याने मज्जाव केला.

दरम्यान संबंधित तरुणी पाच महिन्यांची गर्भवती आहे. शनिवारी तो पत्नीला रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला. त्यावेळी त्याच्या सासूने मुलीला काही दिवस माहेरी नेण्याची परवानगी द्या, अशी विनंती जावयाला केली. मात्र त्याने पुन्हा नकार दिला. मात्र सासूने आपल्या लेकीला जबरदस्ती घरी नेले.

सासूने आपल्या बायकोला माहेरी नेल्याचा जावयाला प्रचंड राग आला. त्याने बायकोच्या माहेरी जाऊन तिच्या घरच्यांना शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने सासूच्या मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ पाठवले. त्यानंतर सासूने ज्युबिली लाईन पोलिसात तक्रार दिली. सासूच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

News English Summary: A shocking incident has taken place in Hyderabad in the state of Telangana. One Son in Law did a shocking act in a family dispute. Son in Law has vented his anger on his wife for taking a prostitute against his will and sent pornographic video clips to his mother-in-law’s phone. This has caused a stir.

News English Title: Son in Law sent a pornographic video clips to his mother-in-law’s phone news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x