14 January 2025 1:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

वाझेंच्या नेतृत्वातील पथकातील सहकारी पोलीस NIA कार्यालयात दाखल

Sachin Vaze, Mumbai Police, NIA

मुंबई, १४ मार्च: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्कॉर्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी राज्यातील वातावरण चिघळून निघाले होतं.ATS आणि NIA कडून यासंदर्भातला तपास सुरू आहे.काल दिवसभर तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॅंट केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.

यानंतर आता भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या हकालपट्टीची मागणी भारतीय जनता पक्षाने केला आहे.दुसरीकडे सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

दुसरीकडे महत्वाचं म्हणजे वाझेंच्या नेतृत्वातील पथकाचा भाग असलेले पोलीस NIA कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या घराखाली ठाणे ATS टीम दाखल झाली आहे. टीमचा भाग असलेले दोन जण घराखाली चेकिंग करीत असल्याचं वृत्त आहे. विकास पाम या इमारती खाली ATS दाखल असल्याचं कळतंय. त्यामुळे ATS देखील जोरदार कामाला लागलंय असं म्हटलं जातंय.

 

News English Summary: The state was in a frenzy over the discovery of an explosive device in a Scorpio car in front of the house of industrialist Mukesh Ambani. ATS and NIA are investigating the matter. He is accused of planting a car packed with explosives outside Ambani’s house.

News English Title: State ATS team in action mode after API Sachin Vaze arrest news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x