19 April 2025 11:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

न्यायमुर्ती मृत्यू प्रकरण | न्यायाधीशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष आणि असहकार्य करणाऱ्या CBI'ला सुप्रीम कोर्टाची नोटीस

Supreme Court

नवी दिल्ली , ०६ ऑगस्ट | धनबाद येथील जिल्हा तसेच सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद हे सकाळी वॉकसाठी गेले होते. त्यावेळेस रणधीर वर्मा चौक येथे एका रिक्षाने त्यांना धडक दिली. या धडकेनंतर आनंद हे बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडून होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या सर्व अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये केदा झाला होता.

या CCTV’मध्ये आनंद हे रस्त्याच्या कडेने धावताना दिसत आहेत तर त्याच रस्त्यावरुन एक मोठ्या आकाराची रिक्षा (टमटम रिक्षा) रस्त्यावरुन सरळ जात असताना दिसते. मात्र अचानक ही रिक्षा रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या आनंद यांना धडक देऊन निघून जाते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर जाणूनबुजून या रिक्षाने आनंद यांना धक्का दिला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्येच्या दृष्टीकोनातूनही तपास सुरु केला असला तरी थेट प्रसारमाध्यमांशी बोलणं त्यांनी टाळलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासामध्ये न्यायाधीशांच्या या संक्षयास्पद अपघातामधील रिक्षा ही चोरीची आहे. सदर विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.

दरम्यान, याच प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने सीबीआयला नोटीस बजावली की न्यायाधीशांना धमकावण्याच्या आणि असभ्यतेच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्यामुळे न्यायालयाने सर्व राज्यांना न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांबाबत स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले आहे.

जेव्हा उच्च दर्जाच्या लोकांच्या बाजूने अनुकूल आदेश दिले जात नाहीत तेव्हा न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा एक नवीन ट्रेंड आहे. आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) आणि सीबीआय न्यायव्यवस्थेला अजिबात मदत करत नाहीत. जेव्हा न्यायाधीश तक्रार करतात तेव्हा ते प्रतिसाद देत नाहीत,” असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ ऑगस्ट रोजी आहे, त्यादरम्यान अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांना सर्वोच्च न्यायालयाची मदत करण्यास सांगण्यात आले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Supreme court issues notice to CBI in Dhanbad judge murder case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या