6 February 2025 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

सर्वोच्य धक्का | सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांची महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची याचिका फेटाळली

Parambir Singh

नवी दिल्ली, ११ जून | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्य न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांची महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणानी त्यांच्या विरोधीत प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. सर्वोच्य न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. महाराष्ट्र सरकारला हा मोठा दिलासा मानला जात आहे.सर्वोच्य न्यायालयानं तुम्ही 30 वर्षे पोलीस दलात वर्ष काम करत आहेत. तुम्ही आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहेत. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्हाला आता तुमच्या राज्यावर विश्वास राहिला नाही का? तुमची मागणी धक्कादायक असल्याचं सर्वोच्य न्यायालयानं परमबीर सिंह यांना सुनावलं आहे.

सर्वोच्य न्यायालया काय म्हणाले?

  1. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्ही तब्बल 30 वर्षे महाराष्ट्राची सेवा केली. मात्र आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या राज्याच्या कारभारावर विश्वास नाही? हा धक्कादायक आरोप आहे!”, असं सुप्रीम कोर्ट म्हणाले.
  2. परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांच्यासमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. परमबीर सिंह यांच्या बाजूनं वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी यांनी परमबीर सिंह यांच्यावतीनं युक्तिवाद केला आहे. तरी देखील सर्वोच्य न्यायालयानं परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली.
  3. तुम्हाला फौजदारी कायद्याचे ज्ञान आहे. तुमच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरवर आम्ही स्थगिती द्यावी का? आम्ही सर्व एफआयरबद्दल बोलत नाही. एफआयरासाठी न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे जावा, असं कोर्टानं सांगितलं. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगडं मारु नयेत, असं म्हटलं.

 

News Summary: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh has been dealt a major blow by the Supreme Court. The apex court had demanded that Parambir Singh be investigated by an independent body outside Maharashtra. The Supreme Court has dismissed the petition.

News Title: Supreme court refuses to entertain Param Bir Singh plea seeking transfer of all inquiries against him to outside Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x