सुशांत प्रकरण | मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी लाखो फेक अकाउंट | BOTS चा वापर
मुंबई, ४ नोव्हेंबर: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अनेक धक्कादायक वास्तव समोर येताना दिसत आहेत. देशातील सर्वोत्तम आणि जगात स्कॉटलंड यार्डशी पोलिसांशी तुलना करण्यात येणाऱ्या मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीला समाज माध्यमांवर संशयाचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. समाज माध्यमांनी एकप्रकारे मुंबई पोलिसांनाच तपासावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांचा उपयोग करण्यात आला होता. परंतु , सदर प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रचंड प्रमाणात बदनामी करण्यासाठी समाज माध्यमांवर फेक अकाऊंट ओपन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारला सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बदनाम करण्यासाठी समाज माध्यमांवर BOTS चा वापर केला गेला होता. समाज माध्यमांवर तब्बल दीड लाखांहून अधिक बनावट अकाऊंट तयार करण्यात आले, अशी धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती.
१४ जूनला सुशांत सिंहचा राजपूतच मृतदेह वांद्र्यातील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. प्रथम या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यानंतर ठराविक प्रसार माध्यमांनी कपोकल्पित वृत्त सुरु केल्यानंतर सदर प्रकरणात ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. #JusticeForSSR, #SushantConspiracyExposed, #justiceforsushant, #sushantsinghrajput #SSR असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले होते. समाज माध्यमांवरील बहुतेक अकाऊंट फेक होती, असा धक्कादायक खुलासा मुंबई सायबर पोलिसांनी केला आहे.
दरम्यान मुंबई पोलिसांनी सदर प्रकरणात FIR दाखल केला आहे. संबंधित बनावट खातेधारकांवर IT कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर सेल युनिट या प्रकरणातचा सखोल तपास करणार आहे, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे.
News English Summary: Bollywood actor Sushant Singh Rajput’s suicide case is facing many shocking facts. The role of the Mumbai Police, which has been compared to the best in the country and Scotland Yard in the world, was initially questioned on social media. In a way, the social media had put the Mumbai police in the cage of the accused after investigation. A lot of social media was used for this. However, in this case, shocking information has come to light that a fake account has been opened on social media to discredit the Mumbai Police.
News English Title: Sushant Singh Rajput fake social media account against Mumbai police News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today