21 January 2025 2:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

वाझेला पुन्हा नाव कमवायचं होतं | म्हणून त्याच अट्टाहासातून अँटीलिया कट रचला | आरोप पत्र दाखल

Sachin Vaze

मुंबई, ०४ सप्टेंबर | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवस्थान असलेल्या ‘अँटीलिया’समोर स्फोटके भरलेली स्कार्पिओ गाडी आढळली होती. या प्रकरणी सीबीआयच्या वतीने ३ सप्टेंबर रोजी न्यायालयात १० हजार पानांचं आरोप पत्र दाखल करण्यात आलं. या आरोप पत्रात प्रामुख्याने या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने उत्तम तपास अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट असल्याचं सिध्द करण्यासाठी अँटीलियासमोर स्फोटकांनी भरलेली स्कर्पिओ गाडी ठेवल्याचे नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाझेला पुन्हा नाव कमवायचं होतं, म्हणून त्याच अट्टाहासातून अँटीलिया कट रचला – Ten thousand pages charge sheet filed against Sachin Waze in Antilia case :

10 हजार पानांच्या आरोप पत्रात स्कॉर्पिओ ठेवल्याचे कारण:
त्याचप्रमाणे स्कार्पिओ गाडी चोरी गेल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तिसरा गुन्हा या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह घोडबंदर येथे मिळाल्याने दाखल करण्यात आला. सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या ९ हजारांच्यावर पानांच्या आरोप पत्रात सचिन वाझेने अँटीलियाबाहेर स्फोटकांची गाडी का ठेवली? याचं कारण देण्यात आलं आहे.

वाझेला पुन्हा नाव कमवायचं होतं:
ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात सचिन वाझेला सस्पेंड करण्यात आलं. मात्र, 2020 मध्ये वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं. इतकंच नाही तर क्राईम इन्वेस्टिगेशन यूनिट (CIU) सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर त्याला बसवण्यात आलं. सचिन वाझेची ओळख ही उत्तम तपास अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून होती. मात्र, पंधरा वर्षानंतर मुंबई पोलीस दलात रुजू झाल्यावर त्याला ती ओळख पुन्हा मिळवायची होती. म्हणून त्याने अँटीलियाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्याचा हा सगळा कट रचल्याचे एनआयएने आपल्या आरोप पत्रात म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Ten thousand pages charge sheet filed against Sachin Waze in Antilia case.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x