22 December 2024 8:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

परमबीर सिंग यांची तीन स्वतंत्र तक्रारींवर ‘एसीबी’कडून गोपनीय चौकशी सुरु

Parambir Singh

मुंबई, ११ मे | विवादित मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या तीन स्वतंत्र तक्रारींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गोपनीय चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान तक्रारीतील आरोपांत तथ्य आढळल्यास परमबीर सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी सुरू होऊ शकते किंवा त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल गुन्हा नोंदवून तपास केला जाऊ शकेल.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे, सहायक निरीक्षक अनुप डांगे आणि सट्टेबाज सोनू जालान यांनी सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डांगे यांनी केलेल्या आरोपानुसार, गावदेवी पोलीस ठाण्यात असताना एका पबवर कारवाई आणि पब चालकाविरोधात गुन्हा नोंदविल्याने त्यांना निलंबित केले. निलंबन रद्द करण्यासाठी सिंग यांच्या नातेवाईकाने दोन कोटी रुपयांची मागणी केली.

जालान याने सोमवारी वरळी येथे पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचा पुनरुच्चार केला. तसेच सट्टेबाजी प्रकरणात बॉलीवूडमधील अभिनेत्यांकडूनही सिंग आणि त्यांच्या साथीदारांनी कोटय़वधींची खंडणी उकळली, असा दावा केला.

 

News English Summary: The Anti-Corruption Bureau (ACB) has launched a confidential inquiry into three separate allegations against former Mumbai Police Commissioner Parambir Singh alleging serious corruption. If facts are found in the allegations in the complaint during the interrogation, an open inquiry may be initiated against Parambir Singh or an investigation may be launched by registering a case against him for amassing disproportionate assets.

News English Title: The Anti-Corruption Bureau has launched a confidential inquiry into 3 separate allegations against former Mumbai Police Commissioner Parambir Singh alleging serious corruption news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x