13 January 2025 10:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

देशात 2020 मध्ये धार्मिक आणि जातीय दंगलींच्या घटनांत दुपटीने वाढ - NCRB रिपोर्ट

NCRB report

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर | देशातील धार्मिक आणि जातीय दंगलींच्या घटनांत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे लागू निर्बंधांमुळे नागरिकांच्या हालचालीवर प्रतिबंध सीमित असतानाही धार्मिक आणि जातीय दंगलींच्या घटनांत वाढ झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीत दिसून आले आहे.

देशात 2020 मध्ये धार्मिक आणि जातीय दंगलींच्या घटनांत दुपटीने वाढ – The incidence of religious and ethnic riots in the country doubled in 2020 says NCRB report :

२०२० मध्ये धार्मिक आणि जातीय दंगलींचे ८५७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात २०१९ मध्ये ४३८ धार्मिक आणि जातीय दंगली नोंदवण्यात आल्या होत्या. २०१८ मध्ये हीच संख्या ५१२ होती. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत २५ मार्च २०२० ते ३१ मे २०२० पर्यंत देशात पूर्णतः लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक ठिकाणी लोकांची ये-जा मर्यादित होती, असेही एनसीआरबीने म्हटले आहे.देशात मागील वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये संशोधित नागरिकता कायद्याच्या (सीएए) मुद्यावर अनेक ठिकाणी आंदोलने झाली. उत्तर-पूर्व दिल्लीत दंगली झाल्या आणि मार्चपासून कोरोना महामारीचा प्रकोप सुरू झाला.

उत्तर-पूर्व दिल्लीत सीएएचे समर्थक आणि विरोधकांत हिंसाचार उफाळल्यानंतर २४ फेब्रुवारी २०२० रोजी जातीय दंगली सुरू झाल्या होत्या. त्यात ५३ लोकांचा मृत्यू झाला तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते.२०२० मध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये नोंदवलेल्या सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवल्याच्या एकूण गुन्ह्यात दंगली घडवल्याचे एकूण ५१ हजार ६०६ गुन्हे नोंदवले गेले. अशा प्रकारच्या एकूण गुन्ह्यात दंगलींच्या गुन्ह्यांची संख्या ७२.६ टक्के होती.

महामारीने प्रभावीत ठरलेल्या २०२० या वर्षात गुन्ह्यांच्या संख्येत २८ टक्के वाढ झाली आहे. या अहवालानुसार कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणे हे प्रमुख गुन्ह्याच्या श्रेणीत नोंदले गेले. देशभरात अशा प्रकारचे एकूण ६६ लाख १ हजार २८५ दखलपात्र गुन्हे नोंदले गेले. त्यात भादंविअंतर्गत ४२ लाख ५४ हजार ३५६ गुन्हे आणि विशेष अथवा स्थानिक कायद्यान्वये २३ लाख ४६ हजार ९२९ गुन्हे नोंदले गेले आहेत.

फेक न्यूज आणि अफवा:
फेक न्यूज आणि अफवांच्या प्रकारात २१४ टक्के वाढ झाली आहे. २०२० मध्ये फेक न्यूजचे १ हजार ५२७ गुन्हे नोंदले गेले आहेत. ही संख्या २०१९ मध्ये ४८६ होती आणि २०१८ मध्ये हीच संख्या २८० होती, असेही एनसीआरबीच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: The incidence of religious and ethnic riots in the country doubled in 2020 says NCRB report.

हॅशटॅग्स

#NCRB(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x