14 January 2025 6:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त २ दिवसांपासून बेपत्ता | हे होतं शेवटचे लोकेशन...

Vasai-Virar Municipal Corporation

नालासोपारा, ०४ जून | वसई विरार महापालिकेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे आणि त्यामुळे शहरात नेमकं काय सुरु आहे याची चर्चा रंगली आहे. वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. महानगरपालिकेत मागच्या एक वर्षापासून कोरोना रुग्णांची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदभार प्रेमसिंग जाधव यांच्याकडे होता.

प्रेमसिंग जाधव यांनी सहाय्यक आयुक्तपदावर काम करताना वसई-विरार शहरातील अनेक अनधिकृत बांधकामेही भुईसपाट केलेली आहेत. दोन जून रोजी कामावरून सुटल्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. याबाबत विरार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग जाधव यांचे शेवटचे लोकेशन विरार रेल्वे स्थानकातले असल्याचे समजले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना बेपत्ता केले की बेपत्ता झाले, याविषयी पोलीस तपास करीत आहेत.

 

News English Summary: A shocking incident has taken place in Vasai Virar Municipal Corporation and this has sparked a discussion about what is going on in the city. Vasai-Virar Municipal Corporation Assistant Commissioner Premsingh Jadhav has been missing for the last two days. Premsingh Jadhav has been in charge of disposal of corona patients in the corporation for the last one year.

News English Title : The Missing of Assistant Commissioner of Vasai-Virar Municipal Corporation No contact for two days news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x