9 January 2025 8:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

संजय राठोड यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या सरपंचाचा राजीनामा

BJP Sarpanch, Kalvati Tanda, Minister Sanjay Rathod

मुंबई, १७ फेब्रुवारी: परळीतील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवर्‍यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलं आहे. संजय राठोड या बैठकीला ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूनंतर राठोड नॉट रिचेबल आहेत.

संजय राठोड 3 फेब्रुवारीला झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीला हजर होते. मात्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण समोर आल्यापासून ते नॉट रिचेबल आहेत. मुंबईतील घरातही ते नसल्याची माहिती आहे. त्यातच संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चाही फेर धरत आहेत. परंतु सरकारकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे. दरम्यान एकाबाजूला आक्रमक झालेलं भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि दुसऱ्याबाजूला संजय राठोड यांच्या समर्थनार्थ राजीनामा देणारे भाजपचे पदाधिकारी समोर येतं आहेत.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या काळवटी तांडा येथील सरपंच यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला आहे. सरपंच कमल नाथराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंगळवारी राजीनामा पाठवून संजय राठोड यांचे समर्थन केले आहे.

या पत्रात म्हटलंय की, मी कमल नाथराव चव्हाण काळवटी, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील सरपंच म्हणून मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असून त्याचा स्वीकार करण्यात यावा. राजीनाम्याचं कारण म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षामधील नेते वेळोवेळी महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व व बंजारा समाजातील उच्च पदस्थ लोकनेते संजय राठोड यांना संपविण्याचे कटकारस्थान करत असल्याचं मला जाणवत आहे असा गंभीर आरोप करत कमल चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे.

 

News English Summary: The sarpanch of Kalvati Tanda in Ambajogai taluka of Beed district has resigned from the party, making serious allegations against the party. Sarpanch Kamal Nathrao Chavan on Tuesday tendered his resignation to BJP state president Chandrakant Patil in support of Sanjay Rathod.

News English Title: The sarpanch of Kalvati Tanda in Ambajogai taluka of Beed district has resigned from BJP party news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x