22 December 2024 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price
x

पूजा आणि अरूण वर्गमित्र होते | पण क्लिपमधील आवाज अरूणचा नाही | ग्रामस्थांचा दावा

The villagers, Arun Rathores voice, Audio clip

पुणे, १५ फेब्रुवारी: परळी येथील मूळ रहिवासी युवती पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चा, आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आता पुढे येत असून विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, हे प्रकरण लक्षपूर्वक पाहिले तर यात आतापर्यंत बरीच गुंतागुंतीची माहिती आणि खुलाशे समोर येत असल्याने हे प्रकरण नेमके काय ?हे स्पष्ट होत नाहीये. त्यानंतर तिचे कुटुंबीय पुढे येऊ लागल्याने वास्तव समोर येण्यास सुरुवात झालं आहे.

दुसरीकडे या ऑडिओ क्लिपमध्ये अरूण राठोडचा आवाज नाही असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थ म्हणतात की, पूजा चव्हाण आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे, त्यात अरूण राठोडचं नाव येतं परंतु या क्लिपमधील आवाज अरूण राठोडचा नाही, वडिलांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने तो २ दिवस बाहेर गेला आहे, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे त्यांचे कुटुंब आहे, अरूण हा सुशिक्षित मुलगा आहे, त्याला पुण्याला जाऊन जास्त दिवस झाले नाहीत. पूजा चव्हाण आणि अरूण राठोड हे वर्गमित्र असल्याने त्यांची ओळख होती असं त्यांनी सांगितले. (The villagers have claimed that Arun Rathore’s voice is not in the audio clip)

तसेच अरूण राठोडचा आवाज नाही, त्यामुळे त्यावर शंका आहे. ही दुर्देवी घटना आहे त्यात चांगल्या नेत्यांना ओढणं योग्य नाही. संजय राठोड यांची नाहक बदनामी झाली आहे. काहीही पुरावा नसताना फक्त ऑडिओ क्लिपवरून बदनामी करणं योग्य नाही, पोलीस चौकशीतून सत्य बाहेर येईल, विनाकारण बंजारा समाजाची बदनामी होऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पूजा चव्हाण हिचे आजोळ वसंतनगर तांडा येथे असून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पूजाचे आजोबा नारायण सीताराम राठोड आणि आजी कासूबाई नारायण राठोड यांच्याशी बातचीत केली. यावेळी बोलताना पूजाचे आजी-आजोबा म्हणाले की, “पूजा चांगली मुलगी होती. तिची कोणाची दुष्मनी नव्हती. हे सगळं का ? कसं झालं? माहिती नाही. हसत-खेळत असायची. कसला काही त्रास नव्हता. पण पुण्याला जाताना तिचे आई-वडील नको म्हणत होते. तिने तेव्हा त्यांचं ऐकलं असतं तर आज हा दिवस बघायला लागला नसता”, पूजाचे आजी-आजोबा म्हणाले.

 

News English Summary: The villagers have claimed that Arun Rathore’s voice is not in the audio clip. According to the villagers, Pooja Chavan’s suicide is an unfortunate incident. Arun Rathore’s name is mentioned in it but the voice in this clip is not of Arun Rathore. , He did not go to Pune for many days. He said that Pooja Chavan and Arun Rathore were known as classmates.

News English Title: The villagers have claimed that Arun Rathores voice is not in the audio clip news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x