21 April 2025 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

अंधेरी पूर्व रमेश कंपाउंड महाकाली गुंफा रोडवरील जागा गुंडांमार्फत बळकावण्याचा प्रयत्न

Tress passing, MIDC judicial area

मुंबई, २१ मार्च: रमेश कंपाउंड महाकाली गुंफा रोड येथील रमेश सिंग या जागेचे ताबा असलेल्या मालकाची जागा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पुढे करून हडपण्याचा प्रकार खुलेआम सुरु असल्याचं वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये राजकीय लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने अंधेरी पूर्वेकडील स्थानिक MIDC पोलीस स्टेशन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका राजकीय लोकप्रनिधीचा या जागेवर डोळा असल्याने जागेचे ताबा मालक रमेश सिंग यांना गुंडांच्या मार्फत घाबरविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांच्याच जागेत गुंडांना घुसवून जागा खाली करण्याच्या धमक्या दिल्या जातं आहेत आणि त्यांना आत जाण्यापासून रोखण्यात येतं आहे.

रमेश सिंग यांनी न्यायालयात याचिका यापूर्वीच दाखल केली आहे. सदर विषय न्यायप्रविष्ठ असताना देखील गुंड प्रवृत्ती पुढे करून जागा हडपण्याचा प्रकार सुरु केला आहे. मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दोनच दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांना संबोधित करताना यापुढे पोलिसांकडून कोणतीही लहान चूक झाल्यास थेट कारवाई केली जाईल अशी समज दिली होती. त्यानंतर देखील स्थानिक MIDC पोलीस स्टेशन रमेश सिंग यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्वतः रमेश सिंग यांनी केला आहे.

 

News English Summary: It is reported that the land owned by Ramesh Singh at Ramesh Compound, Mahakali Gunfa Road, is being openly grabbed by some goons. Shockingly, it has been alleged that the local MIDC police station in Andheri East is ignoring it as it has the blessings of political representatives. As a political MP has an eye on the place, an attempt is being made to intimidate the owner of the place, Ramesh Singh, through goons. The goons are being threatened to enter the area and they are being prevented from entering.

News English Title: Tress passing at MIDC judicial area news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या