रिपब्लिककडून गोपनीय माहितीचा दुरुपयोग आणि विपर्यास | BARCची पत्रक काढून नाराजी
मुंबई, १८ ऑक्टोबर : ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीने खासगी संभाषण आणि ई-मेल संवादातली गोपनीय माहिती उघड केली आणि त्याचा दुरुपयोग करत विपर्यास केला असं Audience Research Council (BARC) ने म्हटलं आहे. याप्रकरणी BARCने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पत्र काढून BARCने आपली भूमिका स्पष्ट केली.
याबाबत BARCने रविवारी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, टिआरपी घोटाळ्याबाबत सध्या मुंबई पोलीस चौकशी करत आहे. चौकशी सुरू असल्याने BARC त्याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. चौकशी संस्थाना BARC सहकार्य आणि मदत करत असल्याचंही त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.
— BARCIndia (@BARCIndia) October 18, 2020
खासगी संभाषण आणि ईमेल्सच्या माध्यमातून जो गोपनीय संवाद झाला होता त्याचा दुरूपयोग करत त्याचं चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करणं हे योग्य नाही. त्याबद्दल आम्ही तीव्र नापसंती आणि नाराजी व्यक्त करत आहोत. अशी कृती करणं हे व्यवसाय मुल्यांशी प्रतारणा केल्यासारखं आहे असं BARCने पत्रकात म्हटलं आहे.
या प्रकरणी जी चौकशी सुरू आहे त्यावर आम्हाला कुठलही मत व्यक्त करायचं नाही याचा पुनरुच्चारही BARCने पत्रकात केला आहे. BARCसोबत ई-मेलव्दारे जो संवाद झाला त्यातली माहिती ही मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांना छेद देणारी आहे असा दावा ‘रिपब्लिक’ने केला होता. त्यानंतर चर्चा सुरू झाल्याने BARCने आज हे स्पष्टिकरण दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघड करत तीन चॅनल्सना जबाबदार धरलं होतं. त्यात रिपब्लिक वाहिनीचाही समावेश होता.
मुंबई पोलिसांनी TRP घोटाळा उघडकीस आणला होता आणि संबंधित टीव्ही वृत्तवाहिन्यांचे धाबे दणाणले होते. दरम्यान, रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी पैसे पुरविणाऱ्या उमेश मिश्राला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तो ‘हंसा’चा माजी कर्मचारी असून त्याला शुक्रवारी मुंबई गुन्हे गुप्त वार्ता विभागाने (सीआययू) विरार येथून अटक केली होती. वादग्रस्त रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन स्थानिक चॅनेल्सनी जाहिराती मिळविण्यासाठी टीआरपी रॅकेटमधून कोट्यवधीचा महसूल जमविल्याचे मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले. रिपब्लिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संपादक अर्णब गोस्वामी व इतरांची या प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
Television Rating Points (TRP) manipulation case accused Vinay Tripathi being produced at Esplanade court.(PTI) pic.twitter.com/sl1UGFfDJC
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 18, 2020
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी (२१), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (४४), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (४७), फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (४४) आणि उत्तर प्रदेशमधून विनय त्रिपाठीला अटक करण्यात आली आहे. मिश्रा याच्या अटकेनंतर पोलिसांकडून आता दिनेश विश्वकर्मा, रॉकी व अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
News English Summary: In the ongoing TRP scam where three channels have been accused of manipulation their television rating point, the Broadcast Audience Research Council (BARC) on Sunday expressed its disappointment with Republic Network for “disclosing their private & confidential communication” and “misrepresenting the same”. Issuing a statement, it said, “BARC India has not commented on the ongoing investigation and it is providing necessary assistance to the law enforcement agency, BARC India is highly disappointed with the actions of the Republic Network by disclosing private and confidential communications and misrepresenting the same.
News English Title: TRP fraud case BARC India expresses dismay over Republic TV network for disclosing confidential communication News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या