15 November 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

TRP Scam | रिपब्लिककडून लाच घेणाऱ्या दासगुप्ताच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

TRP Scam, Former CEO of BARC, Partho Dasgupta, Judicial custody

मुंबई, ३१ डिसेंबर: पार्थो दासगुप्ता हे ‘बार्क’मध्ये सीईओपदावर असताना टीआरपी मोजण्याचा डेटा आल्यावर त्यामध्ये फेरफार करून आणि त्यानंतरच तो जाहीर केला जाई. ‘रिपब्लिक’ वाहिनीला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी हा खटाटोप केला जात होता. डेटामध्ये फेरफार करण्यास ‘बार्क’मधील अनेकांचा विरोध असायचा; मात्र दासगुप्ता यांनी हाताशी घेतलेले काही जण यासाठी त्यांना मदत करायचे. हे नेमके अधिकारी कर्मचारी कोण आहेत, याबाबत चौकशी करण्यासाठी मंगळवारी दासगुप्ता यांना घेऊन पोलिसांनी ‘बार्क’चे कार्यालय गाठले. त्यांची संपत्ती तपासण्यासाठी बँक खात्यांचा तपशील, बँकेतील लॉकर तसेच इतर गुंतवणुकीबाबत पोलिसांनी चौकशी केली.

रिपब्लिक वाहिनीचे संस्थापक-संपादक अर्णव गोस्वामी यांनी सहा वेळा भेटून पैसे दिल्याचे दासगुप्ता यांनी म्हटले आहे. यातील तीन वेळा मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये झालेल्या भेटीचा तपशील त्यांनी पोलिसांना दिला आहे. या ठिकाणी झालेल्या आर्थिक व्यवहाराचे पुरावेदेखील पोलिसांच्या हाती लागल्याने अर्णव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘रिपब्लिक’कडून हॉलिडे पॅकेज; तसेच रोख मोबदला दासगुप्ता यांना मिळाला असून, यातून त्यांनी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे.

मुंबई येथील मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी न्यायालयाने यापूर्वी दासगुप्ताला २८ डिसेंबर, २०२० पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती, नंतर ती ३० डिसेंबर, २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती. काल पार्थो दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली आणि त्यानुसार न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोंस्वामीला अजून मोठा धक्का बसला आहे.

 

News English Summary: Dasgupta was earlier remanded in police custody till December 28, 2020 by the Chief Metropolitan Magistrate’s Court in Mumbai, which was later extended till December 30, 2020. Yesterday, Partho Dasgupta was produced in court by the Mumbai Police and asked to extend his police custody, according to which the court has remanded him in judicial custody for 14 days. This has come as a shock to Republic TV and Arnab Gonswami.

News English Title: TRP Scam former CEO of BARC Partho Dasgupta got 14 days judicial custody from Mumbai court news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x