13 January 2025 8:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

TRP घोटाळा | रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या प्रिया मुखर्जींची मुंबई पोलिसांकडून तब्बल ५ तास चौकशी

TRP scam, Mumbai Police, Republic TV, Priya Mukherjee

मुंबई, १८ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर रिपब्लिकच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून टीआरपी घोटाळ्याच्या तपासाला पुन्हा गती देण्यात आली आहे. काल म्हणजे दिनांक १७ नोव्हेंबर मंगळवारी मुंबई पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या मुख्य ऑपरेटर अधिकारी प्रिया मुखर्जी (Chief Operating Officer Priya Mukherjee of Republic TV News Channel) यांची तब्बल ५ तास कसून चौकशी केल्याचं वृत्त आहे. तत्पूर्वी या घोटाळ्यात एकूण १२ जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये रिपब्लिक वृत्त वाहिनीचे (Republic TV) मुख्य वितरक घनःश्याम सिंग यांचा देखील समावेश आहे.

आर्थिक देवाण घेवाण करत कृत्रिमरित्या टीआरपी वाढविण्याचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर, दिवसेंदिवस या मोठ्या घोटाळ्याची व्याप्ती अधिकच वाढताना दिसत आहे. सदर प्रकरणात एकूण ६ वाहिन्यांचा समावेश असल्याचं आढळलं आहे, तसेच आरोपींची संख्या देखील एक डझनच्या घरात गेली. विशेष म्हणजे काही आरोपी, साक्षीदार तसेच वाहिनी सुरू ठेवण्यासाठी पैसे घेतलेले ग्राहक यांच्या चौकशीतून रिपब्लिक टीव्हीचे नाव वेगाने पुढे येत होते. परंतु घनःश्याम सिंग यांच्या अटकेमुळे या घोटाळ्यात रिपब्लिकचा थेट सहभाग असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स धाडण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, यापूर्वी रिपब्लिकच्या मुखर्जी यांना दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, काही कारणास्तव त्या चौकशीसाठी येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पुन्हा नव्याने समन्स जारी केले. यानंतर मंगळवारी प्रिया मुखर्जी विशेष पथकासमोर चौकशीला सामोऱ्या गेल्या. त्यावेळी त्यांची तब्बल ४ ते ५ तास कसून चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांना आज म्हणजे बुधवारी देखील चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे सलग २ दिवस रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांच्या चौकशा होऊ लागल्याने त्यांचे धाबे दणाणण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, घनःश्याम सिंग यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यामुळे जामिनासाठीचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. रिपब्लिकचे आणखी काही अधिकारी आणि पदाधिकारी यांना चौकशीला समन्स पाठविण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

 

News English Summary: Republic TV’s editor-in-chief Arnav Goswami is likely to face more repercussions after the Supreme Court granted him bail in the Naik suicide case. This is because the Mumbai Police Crime Branch has stepped up its probe into the TRP scam. Yesterday, on Tuesday, November 17, the Special Investigation Team of the Mumbai Police interrogated Priya Mukherjee, the Chief Operating Officer of the Republic News Channel, for five hours. Earlier, a total of 12 people were arrested in the scam, including Ghanshyam Singh, the main distributor of Republic TV.

News English Title: TRP scam Mumbai Police interrogated Republic TV operator head Priya Mukherjee News updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x