22 January 2025 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

आरोपींची धक्कादायक माहिती | रिपब्लिकसहित या वाहिन्यांच्या मालकांकडून पैसे मिळाले

TRP Scam, Republic TV, Mahamovies, News Nation TV channel

मुंबई, २५ ऑक्टोबर: मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात अटक केलेल्या आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपब्लिक टीव्ही, महा मुव्हीज आणि न्यूज नेशन या तीन वाहिन्यांच्या चालक आणि मालकांकडून पैसे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींनी थेट चालक आणि मालकांची नावे घेतल्याने पोलिसांनी त्यांना ‘पाहिजे आरोपी’ केले आहे. यामुळे या वाहिन्यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे.

पैसे देऊन टीआरपी वाढवण्याचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ या दोन चॅनेल्सचे मालक शिरीष सतीश पट्टानशेट्टी आणि नारायण नंदकिशोर शर्मा यांच्यासह हंसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी रामजी वर्मा आणि दिनेश विश्वकर्मा या आरोपींची कोठडी संपत असल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे.

अटक आरोपींच्या चौकशीमध्ये अभिजित उर्फ अजित व त्याच्या अन्य साथीदारांनी रिपब्लिक टीव्ही, महामूव्हीज आणि न्यूज नेशन या वाहिन्या पाहण्यासाठी पैसे दिल्याचे म्हटले आहे. तसेच आरोपींना कोठडी वाढवून मिळावी यासाठी पोलिसांनी न्यायालयात केलेल्या अर्जात याबाबत नमूद केले असून, या तिन्ही वाहिन्यांच्या चालक, मालक आणि इतर सहकाऱ्यांना ‘पाहिजे आरोपी’ करण्यात आले आहे. त्यामुळे फक्त मराठी तसेच बॉक्स सिनेमा प्रमाणे या वाहिन्यांच्या मालकांवरही या प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

तत्पूर्वी टीआरपी घोटाळ्यात (TRP Scam Case) दिवसागणिक नवनवीन प्रकार समोर येत असून या प्रकरणात संशयित असलेल्या वाहिन्यांनी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या आरोपींनी आर्थिक व्यवहारासाठी बोगस कंपन्या थाटल्या होत्या असे तपासातून उघड झाले आहे. आर्थिक व्यवहाराचे काही पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री पवई येथून हरिष पाटील (४५) या व्यक्तीला अटक के ली. पाटीलच्या नावे सात कंपन्यांची नोंद आह.

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक (Mumbai Police Crime Branch) नेमले असून आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. यातील एका पथकाने गुरूवारी हरिष पाटील याला अटक केली. पाटीलच्या नावे सात कंपन्यांची नोंद असून त्यापैकी कॅप्स लॉक डीजीटल सोल्यूशन नावाच्या कंपनीद्वारे एका संशयीत वाहिनीचे आर्थिक व्यवहार समोर आले आहेत. पथकाने प्रत्यक्ष शहानिशा केली असता दिलेल्या पत्त्यावर अशी कोणतीही कंपनी आढळली नाही. या कंपनीचे देशभरात १४२२ वेण्डर असून पाटील त्यापैकी एक आहे. पाटील याच्या अटकेने या घोटाळ्यातील अटक आरोपींची संख्या ९ वर पोहचली आहे. रिपब्लीक वाहिनीचे सीएफओ शीवा सुंदरम अणि वितरण विभागाचे प्रमुख घनश्याम सिंग यांची शुक्रवारी तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली.

 

News English Summary: The Mumbai Police probing the alleged manipulation of television rating points (TRP) told a local court Saturday that the owner of Republic TV channel is a ‘wanted accused’ in the case. This is the first time the city police have named Republic TV in its court filings. Other than Republic TV, it has also shown owners of News Nation, Maha Movie and persons associated with the running of these channels as ‘wanted’ in the case. While seeking the custodial remand of arrested accused-Ramji Verma and Dineshkumar Vishwakarma, in their remand application police mentioned “Abhishek Kolevade Ajit alias Amit, owners of Republic TV news channel, News Nation, Maha Movie and those related with the running of these channels, Rocky and other accused,” as ‘wanted accused in the case’.

News English Title: TRP Scam Republic TV Mahamovies and News Nation TV channel directors owners dubbed accused News Updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x