13 January 2025 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

TRP Scam | रिपब्लिकच्या ५ गुंतवणूकदारांना समन्स जाताच भाजपला जाग आल्याची चर्चा? - सविस्तर

TRP scam, summon to Republic TV investors, Mumbai Police

मुंबई, १३ नोव्हेंबर : अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून भारतीय जनता पक्षातील नेते अर्णब गोस्वामींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आता भाजप नेत्यांचे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीसोबत असलेले कनेक्शन्स समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

अर्णब गीस्वामी यांनी २०१७ मध्ये रिपब्लिक टीव्हीची स्थापना केली होती. त्यामध्ये राजीव चंद्रशेखर यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत स्वतःकडे मोठा हिस्सा घेतला होता. ३ एप्रिल २०१८ रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपकडून राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली होती. त्याबाबत त्यांनी स्वतः ट्विट केलं होतं.

तत्पूर्वी राजीव चंद्रशेखर यांनी भाजपामध्ये रुजू झाल्यामुळे आणि भाजप खासदार म्हणून निवडून आल्याने त्यांच्या मालकीचे रिपब्लिक टीव्हीचे बरेचसे शेअर्स अर्णब गोस्वामी यांना बायबॅक करण्यास सांगितले होते आणि त्यानंतर त्यांची एशियानेट न्यूज मीडिया अँड एंटरटेनमेंट रिपब्लिक टीव्हीमधील अल्प भागीदार झाली. त्यामुळे भारतीय जनता पक्षातील नेते अर्णब गोस्वामी यांना का वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत याचा प्रत्यय येण्यास सुरुवात होईल असं म्हटलं जातंय.

तत्पूर्वी टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीत पैशाचे अमिष दाखवून अनेक घरांमध्ये टीआरपी मशिन बसवून टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ‘रिपब्लिक टीव्ही’च्या पाच गुंतवणूकदारांना गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात समन्स जारी केले होते. त्यामुळे ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आत्या पाच गुंतवणूकदारांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार होते. महत्त्वाचं म्हणजे त्यातील चार कंपन्यांचे मुख्य कार्यालय कोलकात्यात आहेत. त्या कंपन्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत कोणते आहेत याची देखील चौकशी होणार होती.

याप्रकरणी वाहिन्यांच्या आर्थिक व्यवहारांचे गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले होते. आरपीजी पावर ट्रेडिंग, अनंत उद्योग एलएलपी, पूर्वांचल लिझिंग, पॅन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि डायनामिक स्टोरेज अँड रिट्रीव्हल सीस्टीम या कंपन्या रिपब्लिक वाहिनीत गुंतवणूकदार आहेत. आरपीजी कंपनीने १० कोटी रुपयांची, तर अनंत उद्योग एलएलपीने ७.५ कोटी रुपयांची गुंतवणूक रिपब्लिक वाहिनीत केली आहे. समन्स पाठवण्यात आलेल्या ५ कंपन्यांपैकी २ कंपन्यांच्या संचालकांना ३० ऑक्टोबरला चौकशीस हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. रिपब्लिकचे गुंतवणूकदार मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण टीमच्या रडारवर येताच दिल्लीतून सूत्र हलण्यास सुरुवात झाल्याची चर्चा सध्याच्या घटनाक्रमावरून सुरु झाली आहे.

 

News English Summary: Republic TV was founded by Arnab Giswami in 2017. Rajiv Chandrasekhar had invested heavily in it. On April 3, 2018, he was sworn in as a Rajya Sabha MP from the BJP in the presence of Prime Minister Narendra Modi. He had tweeted about it himself. Earlier, Rajiv Chandrasekhar had asked Arnab Goswami to buy back most of his shares in Republic TV after he joined the BJP and was elected as a BJP MP, and later became a small partner in Asianet News Media and Entertainment Republic TV. Therefore, it is said that the realization of why BJP leaders are trying to save Arnab Goswami will begin to emerge.

News English Title: TRP scam summon on was sent to Republic TV investors news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x