TRP Scam कोट्यवधींचा | पण हा घोटाळा दाबला जातं होता

मुंबई, १४ ऑक्टोबर : केंद्रीय माहिती आणि प्रसारण खाते मंत्र्यांचे वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्याकडे लक्ष हवे होते. परंतु, कोट्यवधींच्या हा घोटाळा दाबण्याची केंद्र सरकार भूमिका घेत होते, असा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांना केला आहे.
मुंबई पोलिसांनी नुकताच दूरचित्र वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू असलेला टीआरपी घोटाळा उघडकीस आणला. याबाबत प्रवक्ते तिवारी बोलत होते. ते म्हणाले, मुंबई पोलिसांनी उघडकीला आणलेला टीआरपी घोटाळा स्वतंत्र भारतातील पहिला घोटाळा असून याची थेट जबाबदारी या खात्याचे मंत्री म्हणून प्रकाश जावडेकर यांच्याकडे जाते. त्यांच्या खात्याकडून हा मोठा घोटाळा दुर्लक्षित कसा झाला? याचा खुलासा जावडेकर यांनी करायला हवा, अशी मागणीही गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते म्हणाले, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काही निवडक वृत्तवाहिन्यांची एकांगी, लहरीपणाची व प्रसंगी टोकाची भूमिका घेण्यात वाढ झाली आहे. सामाजिक वातावरण सोईने प्रक्षोभक बनवण्याची वृत्तीदेखील बळावल्याचे निदर्शनास येत आहे. ज्वलंत समस्या व महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेऊन अशी एकांगी, किळसवाणी पत्रकारिता गेली काही दिवस दूरचित्र वाहिन्यांमध्ये सुरू असल्याबाबतही तिवारी यांनी खंत व्यक्त केली.
प्रिंट मीडियाची विश्वासार्हता अधोरेखित:
पत्रकारितेच्या मूळ धर्मापासून दूर जाऊन, हव्या त्या विषयावर मीडिया ट्रायल घडवून आणायची व न्यायालयीन व पोलीस प्रशासनिक तपास यंत्रणांचे प्रयत्न मोडीत काढीत आपणास हवा तो नॅरेटीव्ह (कथा-वृत्तांत) निर्माण करायचा व त्या आधारे मोठ्या कंपन्या व जाहिरातदारांचा पैसा लुबाडायचा, असा प्रकार सर्रास चालला होता. हे मुंबई पोलिसांनी पुढे आणले आहे. यातून प्रिंट मीडियाची विश्वासार्हता आणि गरज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली असल्याचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
News English Summary: The Union Information and Broadcasting Minister wanted the news channels to pay attention to the TRP scam. However, the Center was playing a role in suppressing the multi-crore scam, alleges Pradesh Congress spokesperson Gopaldada Tiwari. Mumbai Police recently exposed the ongoing TRP scam in television news channels. The TRP scam is the first of its kind in independent India and the direct responsibility for this goes to Prakash Javadekar as the Minister of this Department. How did this big scam go unnoticed by his account? Gopaldada Tiwari also demanded that Javadekar should reveal this.
News English Title: TRP scam was being suppressed allegations News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल