13 January 2025 10:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

महिलेला विनयभंग केल्याची खोटी तक्रार द्यायला लावत शिवसेना नगरसेवकाकडे खंडणीची मागणी | २ पत्रकारांना अटक

Shivsena

पुणे, १४ सप्टेंबर | महिलेला विनयभंग केल्याची तक्रार द्यायला लावून शिवसेनेच्या नागरसेवकाकडे बदनाम करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी माजी उपसरपंच, पत्रकारांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन पत्रकारासह साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

महिलेला विनयभंग केल्याची तक्रार द्यायला लावत शिवसेना नगरसेवकाकडे मागितली खंडणी, २ पत्रकारांना अटक – Two journalists arrested for demanding rupees 15 Lakh ransom from Shivsena Corporator :

हा प्रकार 4 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत सावतामाळी चौकातील नगरसेवकाच्या कार्यालयात घडला. माजी उपसरपंच प्रितम शंकरसिंग परदेशी, संगिता वानखेडे, कांतीलाल सावता शिंदे, गितांजली भस्में, कल्पेश अनंतराव भोई (वय-49), मंदा जोगदंड, कुणाल राऊत (सर्व रा. चाकण), संगिता नाईकरे (रा. तनिष सोसायटी फ्लॅट नं, सी 901 दिघी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 41 वर्षीय नगरसेवकाने फिर्याद दिली आहे. त्यानंतर पत्रकार कल्पेश अनंतराव भोई आणि कुणाल राऊत यांना सोमवारी रात्री अटक केली आहे. फिर्यादी हे शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने आरोपींनी एका महिलेला चाकण पोलीस ठाण्यात वारंवार पाठवले.

या नगरसेवका विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यास सांगितले होते. दरम्यान, हे प्रकरण मिटवण्यासाठी ब्लॅकमेल करुन सुरुवातीला 15 लाखांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर तडजोड करुन 12 लाख किंवा 5 लाख रुपये व तक्रारदार महिलेच्या उपचारासाठी वारंवार पैशांची मागणी केली. पैशाची मागणी करण्याच्या सर्व घटना नगरसेवक यांच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. तसेच पैशांची मागणीचे व्हॉट्सअॅप चॅटिंग देखील समोर आले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Two journalists arrested for demanding rupees 15 Lakh ransom from Shivsena Corporator.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x