23 February 2025 4:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

डॉन अभी जिंदा है! छोटा राजनच्या मृत्यूची अफवा

Don Chhota Rajan

नवी दिल्ली, ०७ मे | अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला कोरोनाची लागण झाली होती. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते.

तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती.एप्रिलच्या मध्यात तुरुंग क्रमांक दोनमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर छोटा राजनमध्ये करोनाची लक्षणं दिसून आली. त्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे या तुरुंगातील कैद्यांना वेगळं ठेवलं गेलं आहे, असं तुरुंग प्रशासने सांगितलं होतं.

दरम्यान, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने छोटा राजन हा जिवंत असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच एम्समध्ये उपचारादरम्यान राजनवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी राजनचा मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली होती. मात्र काही वेळातच एएनआयने एम्समधील सुत्रांच्या हवाल्याने राजन जिवंत असल्याचं म्हटलं आहे.

 

News English Summary: Underworld don Chhota Rajan has died due to corona. Underworld don Chhota Rajan was infected with corona. While serving his sentence in Tihar Jail, Chhota Rajan’s report was positive. He was admitted to AIIMS Hospital in Delhi on April 27 for treatment.

News English Title: Underworld Don Chhota Rajan is still Live said AIIMS hospital news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x