22 November 2024 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

वसुली प्रकरण आणि परमबीर सिंग | डॉन छोटा शकीलचं नाव देखील चौकशी फेऱ्यात

Parambir Singh

मुंबई, ०३ ऑगस्ट | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अवतीभोवती सुरू असलेल्या तपासाची सुई आता अंडरवर्ल्डकडे वळली आहे. आता वसुली प्रकरणात दाऊद इब्राहिमचा अँगल जोडला गेला आहे. मुंबई पोलीस आता 2016 च्या एका अशा ऑडिओची पुन्हा तपासणी करत आहेत ज्याच्या आधारे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्या काळात कारवाई करण्यात आली होती.

दाऊद इब्राहिमचा उजवा हात छोटा शकीलने एका बिल्डरला धमकी दिल्याचा दावा या ऑडिओद्वारे करण्यात आला होता. हा ऑडिओ ‘एबीपी न्यूज’च्या हाती लागल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणातील नवीन वळण समजून घेणे गरजेचे आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव श्यामसुंदर अग्रवाल आहे. श्यामसुंदर अग्रवाल यांच्या मते, त्यांना बनावट प्रकरणात गोवण्यात आले आणि MCOCA केस चुकीच्या पद्धतीने नोंदवण्यात आली.

श्यामसुंदर अग्रवाल यांनी आरोप केला होता की, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धमकावण्यात आले आणि खंडणी वसूल करण्यात आली. ज्या ऑडिओच्या आधारे मुंबई पोलिसांनी 17 फेब्रुवारी 2021 रोजी श्यामसुंदर अग्रवालविरोधात गुन्हा नोंदवला, आता मुंबई पोलीस एसआयटी स्थापन करून त्याच ऑडिओची सत्यता तपासत आहेत.

काय आहे या ऑडिओमध्ये?
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑडिओमध्ये छोटा शकील संजय पुनमिया नावाच्या बिल्डरला धमकावत आहे. पोलिसांच्या क्राइम डाटानुसार, ज्या फोन नंबरवरून संजय पुनमिया यांना फोन आला तो छोटा शकीलचा आहे. छोटा शकील फोन करून संजय पुनमियावर श्यामसुंदर अग्रवालसोबत समझौता करण्यासाठी दबाव आणत आहे.

संजय पुनमिया यांच्या तक्रारीवरून श्यामसुंदर अग्रवालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘एबीपी न्यूज’ला मिळालेल्या ऑडिओमध्ये श्यामसुंदर अग्रवाल याचे नाव वारंवार येत आहे. हा ऑडिओ 2016 चा आहे, परंतु या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यावर कारवाई करण्यात आली.

आता श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून संजय पुनमिया आणि माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचा असा विश्वास आहे की अग्रवाल यांच्याविरोधात नोंदवलेला गुन्हा बनावट होता आणि हा गुन्हा केवळ वसुलीसाठी नोंदवण्यात आला होता, ज्याची चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांनी छोटा शकीलला अग्रवालचे नाव वापरून संजयला फोन करण्यास सांगितले, जेणेकरून अग्रवालवर गुन्हा दाखल करता येईल. तसेच श्यामसुंदर अग्रवाल यांच्याविरोधात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांत 19 गुन्हे दाखल आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Underworld Don Chhota Shakeel in the recovery case investigation against former commissioner Parambir Singh news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x