महिलेवर सामूहिक बलात्कार | तक्रार करण्यास गेल्यावर योगी सरकारच्या पोलिसाकडूनही बलात्कार
लखनऊ, २५ डिसेंबर: हाथरस सामूहिक बलात्काराच्या भीषण घटने नंतरही योगी सरकारच्या राज्यात बलात्काराचे धक्कादायक प्रकार समोर येतं आहेत. सामुहिक बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या पीडितेवर तिथल्या एका पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे ही घटना घडली आहे.
जलालाबादमध्ये राहणारी एका ३५ वर्षीय महिलेनं तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार केल्याची माहिती पोलीस क्षेत्राधिकारी ब्रह्मपाल सिंह यांनी दिली. ‘महिलेनं दिलेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबरला मदनपूरला जात असताना ती प्रवास करत असलेली ई-रिक्षा खराब झाली. त्यानंतर ती पायी चालू लागली. त्याचवेळी कारमधून आलेल्या पाच जणांनी तिला जबरदस्तीनं शेतात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला,’ असं सिंह यांनी सांगितलं.
पीटीआयच्या वृत्तानुसार, ३० नोव्हेंबर रोजी सदर धक्कादायक घटना असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारानंतर पीडित महिलेने जलालाबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी या पोलीस ठाण्यात एक पोलीस उपनिरिक्षक उपस्थित होता त्याने तिला त्याच्या खोलीत नेले आणि तिथे बलात्कार केला. या दोन्ही धक्कादायक प्रकारांनंतरही पीडितेची तक्रार नोंदवली गेली नाही. त्यामुळे तीने थेट बरेलीचे सहाय्यक पोलीस महासंचालक अविनाश चंद्रा यांची बुधवारी भेट घेऊन प्रकार उजेडात आणला. एकूण योगी सरकारच्या राज्यात महिला किती असुरक्षित आहेत त्याचा प्रत्यय वारंवार येतं आहे आणि हे सर्व प्रकार अत्यंत क्लेशदायक आहेत.
News English Summary: Even after the horrific incidents of Hathras gang rape, shocking forms of rape are emerging in the state of Yogi government. The victim, who had gone to the police station to lodge a gang-rape complaint, was allegedly raped again by a local police officer. The incident took place at Shahjahanpur in Uttar Pradesh.
News English Title: Uttar Pradesh woman suffer from gang rape was again raped in police station during she went to register a complaint news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today