14 January 2025 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

या प्रकरणात अंबानींची तक्रारच नाही | वाझे प्रकरणात राजकारण - अॅड. असीम सरोदे

Advocate Asim Sarode, Mukesh Ambani, Sachin Vaze

मुंबई, १४ मार्च: मनसुख हिरेन प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी अॅड. असीम सरोदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जिलेटीन स्फोट प्रकरणात अंबानी यांची तक्रार कुठे आहे? असा सवाल करतानाच सचिन वाझेंच्या प्रकरणात राजकारणच अधिक होताना दिसत आहे, अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. (Where is Ambani’s complaint in the gelatin blast case questioned made by advocate Asim Sarode)

असीम सरोदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. घराबाहेर स्फोटकं सापडल्या प्रकरणी अंबानी यांनी लेखी तक्रार केली आहे का? पोलिसांनी त्यांचं स्टेटमेंट घेतलं आहे का किंवा अंबानी यांनी त्यांचंच स्टेटमेंट दिलं आहे का? हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. ज्यांच्याविरोधात कट रचला गेलाय त्यांची स्टेटमेंटच नाहीये. त्यामुळे या प्रकरणात राजकारण होत असल्याचं दिसून येतं, असं सरोदे म्हणाले.

सचिन वाझेच्या कारवाईत राजकारण जास्त दिसतंय. कायद्याचा राजकारणासाठी आपल्या सोयीनुसार वापर केला जातोय, असं सांगतानाच खरंतर एनआयएनं राष्ट्रीय गुन्ह्याचा तपास करणं अपेक्षित आहे, असंही त्यांनी सांगितलं

 

News English Summary: In the case of explosives found outside the house of industrialist Mukesh Ambani, Adv. Asim Sarode has raised some questions. Where is Ambani’s complaint in the gelatin blast case? Asim Sarode has said that in the case of Sachin Vaze, politics seems to be on the rise.

News English Title: Where is Ambani’s complaint in the gelatin blast case questioned made by advocate Asim Sarode news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x