23 February 2025 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा
x

युवासेनेकडून भाजप आ. राम कदमांच्या विरोधात मुंबईत निषेध मोर्चा

Yuvasena protest, Mumbai Police, BJP MLA Ram Kadam

मुंबई, १२ जानेवारी: राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ले करणं नवं राहिलेलं नाही. यामध्ये सर्वाधिक हल्ले हे रहदारी दरम्यान होतात आणि त्यात वाहतूक पोलीस सर्वाधिक लक्ष होतात. काल पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाईकवरून भरधाव वेगाने ट्रिपल सीट जात एका वृद्धेला धडक देण्यात आली. यावेळी संबधित तिघांना हटकणाऱ्या पवई पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविण्यात आला होता. त्यादरम्यान पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.

याप्रकरणी सचिन तिवारी नामक इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर मुख्य आरोपी दिपू तिवारी व आयुष राजभर यांचा शोध सुरू असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून हे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु याच आरोपी कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम यांचा पोलिसांना कॉल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदमांनी पोलिसांना मारहाण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्यानं राम कदमांचा आता निषेध नोंदवण्यात आलाय. वरळीत युवासेनेकडून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार राम कदमांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आलाय. आमदार राम कदम यांच्याविरोधात तुफान नारेबाजीसुद्धा करण्यात आलीय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मानसिकता ही गुंड प्रवृत्तीची असल्याचंही युवासेनेनं सांगितलंय.

महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे आज युवासेनाप्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे गुंड तसेच त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार राम कदम यांनी आपली संस्कृती दाखवल्याचा शिवसैनिकांनी घणाघात केलाय. महाराष्ट्र पोलिसांच्या अस्मितेला जर भारतीय जनता पक्षासारखा गुंड प्रवृत्तीचा पक्ष खतपाणी घालत असेल तर ‘युवासेना’ अखेरपर्यंत कडाडून विरोध करणार असल्याचंही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितलंय.

 

News English Summary: Bharatiya Janata Party (BJP) MLA Ram Kadam has now lodged a protest against the police for pressuring the police to release the BJP workers who had beaten him up. In Worli, Yuvasena has staged a protest against BJP leader and MLA Ram Kadam. Storm slogans were also chanted against MLA Ram Kadam. Yuvasena also said that the mentality of Bharatiya Janata Party workers is hooligan.

News English Title: Yuvasena protest in Mumbai against BJP MLA Ram Kadam news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x