मोदींचा व्होकल फॉर लोकल नारा | भारतीयांकडून एका आठवड्यात चायनीस मोबाईल खरेदीचा विक्रम
नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर: विजयादशमी म्हणजेच दसऱ्या निमित्त देशवासीयींना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आजच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचे त्यांनी सुरूवातीस सांगितले. तसेच, सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा, असं त्यांनी देशवासीयांना आवाहन केलं आहे.
मोदी म्हणाले, ”जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो. तेव्हा सर्वात अगोदर मनात हेच येतं की, बाजारत कधी जायचं काय? खरेदी करायची. विशेषता मुलांमध्या याबद्दल मोठा उत्साह असतो. सणांचे हा उत्साह व बाजारातील चमक एकमेकांशी जुडलेली आहे. मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल, तेव्हा व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना, आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे.”
एकाबाजूला देशात सातत्याने #boycottChina, #boycottChineseProducts चा नारा दिला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला देशात चिनी कंपन्या सातत्याने त्यांच्या वस्तूंची रेकॉर्डब्रेक विक्री करत आहेत. चिनी मोबाईल कंपनी शाओमी इंडियाने (Xiaomi India) या फेस्टिव्ह सीजनमध्ये देशभरातील मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे.
मागील एका आठवड्यात शाओमीने भारतात 50 लाख स्मार्टफोनची विक्री करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. शाओमीच्या या यशात दोन ई-कॉमर्स वेबसाईट्सचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमुळे शाओमीला हा रेकॉर्ड बनवता आला. यावेळी अमेझॉन आणि फ्लिपकार्टसोबत Mi.com द्वारे शाओमीच्या मोबाईल्सची मोठी विक्री झाली आहे. Mi.com ने देशात तब्बल 17,000 पिनकोड्सवर मोबाईल विक्री केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 15,000 किरकोळ भागिदारांनी दरवर्षीपेक्षा दुप्पट विक्री केली आहे.
एमआय इंडियाचे चीफ बिजनेस हेड रघु रेड्डी याबाबत म्हणाले की, “50 लाख स्मार्टफोन्सची विक्री करणे ही मोठी कामगिरी आहे. हे आकडे सांगतायत की ग्राहकांचा आमच्या प्रोडक्ट्सवर किती विश्वास आहे. देशात कोणत्याही स्मार्टफोन कंपनीला हे जमलेले नाही. ग्राहकांना चांगल्या किंमतीत उच्च प्रतीचे प्रोडक्ट विकणे हेच आमचे मुख्य टार्गेट आहे”.
News English Summary: In his monthly radio program ‘Mann Ki Baat’, Prime Minister Narendra Modi urged for low key Dussehra celebrations amid pandemic. He reminded reminded public to be Vocal for Local’ while shopping. He said, ” This time when you go shopping, remember your resolve of ‘Vocal for Local’. When purchasing goods from the market, we have to give priority to local products.” Earlier on October 10, Modi had invited suggestions for topics to discuss in the program.”#MannKiBaat presents a great opportunity to share inspiring journeys of outstanding citizens and discuss themes that power societal change. This month’s program will take place on the 25th.
News English Title: People forgets boycott China sentiments Xiaomi India sold 50 lakh smartphones in a week News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला - NSE: TATAPOWER
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL