मराठी टायपिंग कशी शिकावी? | कम्प्युटर/ लॅपटॉप किंवा मोबाइल'मध्ये अशी शिका - नक्की वाचा
मुंबई ०८ जुलै : मराठी टायपिंग कशी करावी. मराठी टाइपिंग ची सर्वात सोपी पद्धत. आपल्याला मोबाईल वर मराठी टायपिंग करायचे म्हंटले तर जिवावर येते, मग इंग्लिश भाषेमध्येच मराठी वाचता येईल असे टायपिंग करुन बरेच जण आपल्या मित्र मैत्रिणी सोबत अथवा आप्तेष्टांशी चॅटिंग करतात. तर काहींना मराठी मध्ये अर्ज टाइप करायचा असतो किंवा काही कारणास्तव मराठी टाइपिंग कम्प्युटर वर करायची असते, आणि कम्प्युटर किंवा लॅपटॉप वर मराठी टायपिंग कशी करावी हा मोठा प्रश्न उत्भवतो. आम्ही तुमच्या या प्रश्नाचे निवारण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या लेखामध्ये केलेला आहे.
लेखाच्या सुरवातीला आपण कम्प्युटर / लॅपटॉप मध्ये मराठी टायपिंग कशी करावी ते म]बघणार आहोत आणि त्यानंतर मोबाईल मध्ये. आता सध्या अनेक जण आपल्या मोबाईल वर मराठी टायपिंग करत देखील असतील,पण ज्यांना माहिती नाही अशा सर्वांसाठी मोबाईल मधील मराठी टाइपिंग ची माहिती उपयुक्त ठरेल.चला तर मग जाणून घेऊयात मराठी टायपिंग कशी करायची.
कम्प्युटर / लॅपटॉप वर मराठी टायपिंग कशी करावी:
कम्प्युटर/लॅपटॉप वर मराठी टायपिंग करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे मायक्रोसॉफ्ट चे इंडिक लॅंगवेज इनपुट टूल, जे वापरुन तुम्ही अगदी सहजतेने मराठी टाइपिंग करू शकता. या टूल च वापर करून तुम्ही मोबाईल वर चॅटिंग करताना जसे इंग्लिश वर्ड वापरुन मराठी मध्ये बोलता, अगदी तसेच टायपिंग तुम्हाला इथे करायचे आहे,पण तुम्ही जस जसे इंग्लिश शब्द टायप करताल तसे स्क्रीन वर मराठी शब्द येतील. होय हीच तर खासियत आहे मायक्रोसॉफ्ट च्या या टूल ची.
पुढील लिंक वर क्लिक करा अथवा पुढील लिंक कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करा: https://www.microsoft.com/en-in/bhashaindia/downloads.aspx
वरील लिंक वरुन आपण हे मराठी भाषेसाठीचे इंडिक टूल (SDK Version) डाऊनलोड करून घ्या,आणि तुमच्या कम्प्युटर / लॅपटॉप वर इंस्टॉल करा. इंस्टॉल केल्यानंतर खालील फोटो मध्ये दर्शवल्या प्रमाणे तुमच्या स्क्रीन च्या उजव्या कोपर्यात असलेल्या ENG या लॅंगवेज इनपुट टूल च्या चिन्हा वर क्लिक करा. किंवा तुमच्या कीबोर्ड वरील विंडोज चे बटन व स्पेस चे बटन एकसाथ दाबा. इंडिक लॅंगवेज टूल चे मेनू ओपन होतील. त्यातील मराठी भाषा निवडा. आता तुम्ही मराठी टाइपिंग सुरू करू शकता.
मराठी टायपिंग कशी करावी – कम्प्युटर/ लॅपटॉप – Step 1
मराठी टायपिंग कशी करावी – कम्प्युटर/ लॅपटॉप – Step 2
मराठी टाइपिंग करताना आपण जे इंग्लिश मध्ये टाइप करताल त्याचे मराठी मधील उच्चार तुम्हाला खाली दिसतील त्यातील जो शब्द तुम्हाला योग्य वाटतो तो तुम्ही क्लिक करून अथवा स्पेसबार चा उपयोग करून मिळवू शकता.
मोबाईल वर मराठी टायपिंग:
मोबाईल मध्ये मराठी भाषेत मेसेज टाइप करण्यासाठी तुम्ही गूगल प्ले स्टोर वरुन गूगल चा इंडिक कीबोर्ड डाऊनलोड करू शकता. यासाठी प्ले स्टोर मध्ये “Google Indic Keyboard” टाइप करा आणि खाली फोटो मध्ये दाखवलेले अॅप तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करा. इंस्टॉल केल्यानंतर त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन मराठी भाषा निवडा.
google indic keyboard for marathi typing
ज्या वेळी तुम्ही मोबाईल मध्ये कुठेही टायपिंग करण्यासाठी कीबोर्ड ओपन कराल तिथे तुम्हाला बाजूला मराठी टायपिंग चा पर्याय दिसेल.तो निवडा आणि इंग्लिश शब्दांचा वापर करून खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे मराठी टायपिंग सुरू करा.
मोबाईल मध्ये मराठी टायपिंग – स्टेप १
मोबाईल मध्ये मराठी टायपिंग – स्टेप २
सारांश
मराठी टायपिंग करणे आता सोपे झाले आहे. वर दिलेल्या सर्वात सोप्या अशा मराठी टायपिंग च्या पद्धतीने आपण अगदी सहज पणे मराठी टायपिंग करू शकता. मग ते तुम्ही मोबाईल वर करत आहात की कम्प्युटर वर हे काही महत्वाचे नाही कारण दोन्ही मध्ये तुम्ही सहजपणे मराठी टायपिंग करू शकता. मराठी टायपिंग ची कामे देखील याच्या सहाय्याने तुम्ही करून देऊ शकता.
मराठीमध्ये टाईप करण्यासाठी वेगवान पर्याय कोणता आहे.
लॅपटॉप / कम्प्युटर मध्ये वेगवान मराठी टायपिंग करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट चा इंडिक कीबोर्ड हा पर्याय उत्तम आहे तो कसा वापरायचा ते वरील लेखामध्ये दिलेले आहेच. आणि मोबाईल मध्ये मराठी टाइपिंग साठी वेगवान पर्याय म्हणाल तर गूगल चे इंडिक कीबोर्ड हे अॅप्लिकेशन तुम्ही गूगल च्या प्ले स्टोर वरुन डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये डिफॉल्ट कीबोर्ड म्हणून वापरू शकता.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to learn Marathi typing online in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS