17 April 2025 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

मोदी है तो मुमकिन है | सुटीच्या दिवशीही EMI कापणार | ATM मधून पैसे काढणे महाग

PM Narendra Modi

मुंबई, ३१ जुलै | येणारा महिना सामान्य माणसाच्या खिशावर आणखी भार टाकणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 1 ऑगस्ट पासून बँकिंग आणि अर्थविषयक नियमांमध्ये काही महत्वाचे बदल होणार आहेत. यात एकूणच 5 महत्वाचे बदल होत आहेत. त्यामध्ये ईएमआय, एटीएम आणि घरगुती गॅसच्या किमतीसह रोख रकमेच्या व्यवहारात सुद्धा काही बदल होत आहेत.

सुटीच्या दिवशीही EMI कापणार:
बँकिंग व्यवहार रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशी सुद्धा होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस सिस्टिम आठवड्यातील 7 दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच या बदलामुळे पगार आणि पेन्शन रविवार, बँक हॉलिडे आणि इतर सुटीच्या दिवसांमध्ये सुद्धा जमा केले जाणार आहेत. यासोबतच सुटीच्या दिवशी सुद्धा आता EMI पेमेंट कापल्या जाणार आहे.

ATM च्या माध्यमातून आपण 6 मेट्रो शहरांमध्ये महिन्यातून केवळ 3 वेळा व्यवहार करू शकता. नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 वेळा मोफत व्यवहार करता येतील. यानंतर तुम्हाला चार्ज द्यावा लागेल. मेट्रो शहरांमध्ये अतिरिक्त एटीएम व्यवहारांसाठी 20 रुपये तर इतर शहरांमध्ये प्रत्येकवेळा 8.50 रुपये कापले जाणार आहेत.

ATM मधून पैसे काढणे महाग:
1 अगस्त पासून एटीएम चार्जेस वाढवून 17 रुपये करण्यात आले आहेत. यापूर्वी 15 रुपये आकारले जात होते. नॉन-फायनान्शिअल ट्रांझॅक्शनवर सुद्धा 5 रुपये ऐवजी 6 रुपये मोजावे लागणार आहेत. बँका ग्राहकांच्या सुविधेसाठी जागो-जागी एटीएम लावत असतात. इतर बँकांचे ग्राहक सुद्धा यातून पैसे काढू शकतात. मात्र, त्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक वेळा व्यवहार केल्यास ग्राहकांकडून फी घेतली जाते. याला इंटरचेंज फीस असेही म्हटले जाते.

इंडियन पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ची डोअर स्टेप सेवा आता मोफत नाही. त्यासाठी शुल्क द्यावा लागणार आहे. IPPB च्या माहितीनुसार, आता प्रत्येक डोअर स्टेप बँकिंग सेवेसाठी 20 रुपये + GST द्यावा लागणार आहे. यासोबतच, कुठल्याही ग्राहकाला पैसे ट्रांसफर करणे आणि मोबाईल पेमेंट इत्यादींसाठी IPPB 20 रुपये +GST शुल्क आकारणार आहे. IPPB च्या खात्यातून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रांसफर करताना हा शुल्क द्यावा लागेल.

LPG सिलेंडर महागणार?
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतींची घोषणा केली जाते. जुलै महिन्यात सरकारने 14.2 किलो घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 25.50 रुपयांची वाढ केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, आता सबसिडी सुद्धा नाहीच्या बरोबरीला आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: 1st August ATM cash withdrawal charges and transactions limit news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या