मुंबईचं गुजरातीकरण? | अदानी एअर पोर्ट होल्डिंगचं मुख्यालय मुंबईत नव्हे तर अहमदाबादमध्ये असेल

मुंबई, १९ जुलै | गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात का बदल होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा ७४ टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला ५०.०५ टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी २३.५ टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, असे या संबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मात्र आता दोनच दिवसात धक्कादायक गोष्टी मुंबई विमानतळावर घडू लागल्या आहेत. यावर RPG समूहाचे मालक हर्ष गोएंका यांनी मुंबई तळावरील एक व्हिडिओ ट्विट करत खळबळजनक वक्तव्य केल्याने मोठा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ट्विटवर गुजराती नेटिझन्स मुंबई आणि महाराष्ट्रावर थेट दावा ठोकताना तुम्ही काय केलंय महाराष्ट्रासाठी अशा गुर्मी दाखवणारे वक्तव्य करून स्वतःच्या मनातील सुप्त इच्छा व्यक्त करत आहेत. हर्ष गोएंका यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबई एअरपोर्टवर एक इव्हेन्ट साजरा होतं असून त्यात गुजराती गाण्यांवर नृत्य सुरु आहेत. त्यालाच अनुसरून हर्ष गोएंका यांनी म्हटलंय की, “मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याने एरपोर्टवर आनंदोत्सव”.
Mumbai airport celebrating the takeover by Gujarat! pic.twitter.com/w38xHXm8UF
— Harsh Goenka (@hvgoenka) July 17, 2021
त्यानंतर अजून एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी आर. के. जैन यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय Adani Airport Holdings Limited (AAHL) नं आपलं मुख्यालयही दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समुह अतिशय वेगानं प्रगती करत आहे. यासोबतच हा निर्णय घेण्यात आला आहे की AAHL चं मुख्यालय आता मुंबई ऐवजी गुजरातमध्ये असेल, असं अदानी समुहानं एका प्रेस रिलिजद्वारे सांगितलं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Adani group relocate Mumbai Airport AAHL head office from Mumbai to Ahmedabad news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल