18 January 2025 3:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

अफगाणिस्तानमध्ये दडलीय 74 लाख कोटींची साधन संपत्ती | तर अफगाणिस्तान होऊ शकतो सर्वात श्रीमंत देश

Taliban in Afghanistan

काबुल, २० ऑगस्ट | जगातील सर्वात गरीब राष्ट्रांपैकी एक म्हणून अफगाणिस्तानला कमी लेखले जात असले तरी प्रत्यक्षात या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीचे भांडार आहेत. या देशात एक ट्रिलियन डॉलर अर्थात तब्बल 74.37 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त साधन संपत्ती आहे. 2010 मध्ये अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी एका सर्व्हेमध्ये याचा खुलासा केला होता.

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सर्व्हेनुसार, अफगाणिस्तानच्या मध्य आणि दक्षिणेकडील भागांमध्ये एक ट्रिलियन डॉलरची नैसर्गिक साधन संपत्ती (Afghanistan has minerals worth 74 lakh crore resources lithium copper gold oil natural gas) :

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सर्व्हेनुसार, अफगाणिस्तानच्या मध्य आणि दक्षिणेकडील भागांमध्ये एक ट्रिलियन डॉलरची नैसर्गिक साधन संपत्ती आहे. याचा योग्य वापर झाल्यास अख्ख्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट होईल. आता तालिबानने देश काबिज केल्यानंतर तज्ज्ञांच्या चिंता वाढल्या आहेत.

लोह, तांबे, कोबाल्ट आणि सोन्याचे भांडार:
तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानात लोह, तांबे, कोबाल्ट, सोने आणि लीथियमचे भांडार आहेत. अफगाणिस्‍तानात असलेल्या या मिनरल्सचा साठा इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक दुर्मिळ आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात या साधनसामुग्रीची खूप मागणी आहे. याच्याच मदतीने मोबाइल फोन, टीव्ही, हायब्रिड इंजन कार, काँप्युटर, लेझर आणि बॅटरी तयार केल्या जाऊ शकतात. जियोलॉजिकल सर्व्हेनुसार, अफगाणिस्तानात जेवढे लीथियमचे भांडार जगात कुठेच नाहीत. लीथियमने रिचार्जेबल बॅटरी प्रामुख्याने बनवल्या जातात. हवामान बदल रोखण्यासाठी हे एक महत्वाचे तंत्रज्ञान आहे. (Afghanistan has minerals worth 74 lakh crore resources lithium copper gold oil natural gas)

तालिबान आल्याने परिस्थिती सुधारणार नाही:
इकोलॉजिकल फ्यूचर्स ग्रुपचे संस्थापक संशोधक आणि संरक्षण तज्ज्ञ रॉड शूनोवर यांनी सांगितले, सुरक्षेची आव्हाने, पायाभूत सुविधांचा आभाव आणि दुष्काळाने ही साधन संपत्ती अद्याप काढण्यात आलेली नाही. आता अफगाणिस्तानात आता तालिबानी राजवट आल्याने परिस्थिती सुधारणार नाही. लोह आणि तांब्याच्या बाबतीत हा जगातील सर्वात मोठा निर्यातक देश होऊ शकतो. तालिबानचे समर्थन करणाऱ्या चीनसारख्या देशांची यावरच नजर आहे.

सर्वात धनाढ्य देश होऊ शकतो अफगाणिस्तान:
अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेचे मिर्झाद यांनी 2010 मध्ये एका मासिकाला याबाबत माहिती दिली होती. काही वर्षे जरी अफगाणिस्तानात शांतता नांदली, तर साधन सामुग्रीच्या बळावर हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक बनू शकतो.

सध्या 3 देश पुरवतात 75% लीथियम-कोबाल्ट:
संपूर्ण जगाचा विचार केल्यास लीथियम, कोबाल्टसारखे अतिशय दुर्मिळ घटकांचे 75% उत्पादन केवळ 3 राष्ट्र करतात. त्यामध्ये चीन, रिपब्लिक ऑफ कांगो आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे.

चीनचा संपत्तीवर डोळा:
चीनने अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि सलोखा वाढवण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावली आहे आणि त्यामुळे त्यांचे देशाच्या पुनर्बांधणीत योगदान देण्यासाठी आपले स्वागत आहे असे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी चीनच्या माध्यमांना सांगितले आहे.

चीन एक मोठी अर्थव्यवस्था आणि क्षमता असलेला मोठा देश आहे. मला वाटते की ते अफगाणिस्तानच्या पुनर्वसन, पुनर्बांधणीमध्ये खूप मोठी भूमिका बजावू शकतात,”असे शाहीनने गुरुवारी रात्री उशिरा सीजीटीएन टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गेल्या महिन्यात तियानजिनमध्ये तालिबानच्या शिष्टमंडळाशी भेट घेतली होती आणि त्यांना आशा आहे की अफगाणिस्तान इस्लामी धोरण स्वीकारू शकेल असे म्हटले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Afghanistan has minerals worth 74 lakh crore resources lithium copper gold oil natural gas news updates.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x