21 November 2024 11:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मोठा संभ्रम | पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रानं जाहीर केलेली ७०१ कोटीची मदत 2020 सालची

Minister Dada Bhuse

मुंबई, २८ जुलै | काल केंद्र सरकारने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०१ कोटीची मदत जाहीर केल्याचं वृत्त झळकलं. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केंद्राच्या तत्परतेचे गोडवे गाण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता आलेल्या वृत्ताप्रमाणे मोठा संभ्रम झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण स्वतः राज्य सरकारकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

मोदी सरकारकडून महाराष्ट्र सरकारला एकूण ७०१ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत 2020 सालची आहे. जूनते ऑक्टोबर 2020 मध्ये अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी आम्ही 3 हजार 701 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. मोदी सरकारने काल त्यातील 701 कोटी रुपये आता दिले आहेत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. 2020 चे उरलेले 3 हजार कोरी लवकर मिळतील अशी अपेक्षा देखील दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे.

आता महापुरामुळे झालेल्या नुकसानाचा घोषवारा केंद्र सरकारला कळवला जाईल. ती मदतही केंद्र सरकार लवकर करेल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने जाही केलेली मदत ही आताच्या नुकसानासाठी नाही, असं दादा भुसे म्हणाले. या महापुरामुळे राज्यातील 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी अजूनही पुराचं पाणी आहे किंवा तिथे जाण्यात अडचणी येत आहे. तिथले पंचनामे होणं बाकी आहे. त्यामुळे हा आकडा वाढणार आहे. यात भात, ऊस, कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचं नुकसान झालं आहे, असं दादा भुसे म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Agriculture minister Dada Bhuse expects early help from the central government for flood victims news updates.

हॅशटॅग्स

#DadaBhuse(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x