16 January 2025 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL Wedding Insurance | वेडिंग इन्शुरन्स घेण्याचे जबरदस्त लाभ, आता पॉलिसीमधून उचला लग्नाचा खर्च, जाणून घ्या फायद्याची बातमी . Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल NTPC Share Price | पीएसयू NTPC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार हा शेअर, टार्गेट नोट करा - NSE: NTPC Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरबाबत UBS ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA EPFO Minimum Pension | खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, EPFO कडून महिना किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार
x

रशियन एस-४०० खरेदी व्यवहार: ट्रम्प यांची भारताला पुन्हा धमकी

Donald Trump, Narendra Modi, India, Russia, America

वॉशींग्टन डीसी: भारत रशियाकडून अत्याधुनिक एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून हा व्यवहार थांबवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. भारताचा हा निर्णय दीर्घ कालावाधीसाठी भारताच्याच हिताचा नसेल, असे अमेरिकेकडून सूचित करण्यात आले आहे. तसेच या व्यवहारामुळे दोन्ही देशांच्या परस्पर भागीदारीवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी धमकी देखील अमेरिकेकडून देण्यात आली. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोंपियो यांच्या भारत दौऱ्यापूर्वी ओसाका येथील जी-२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दक्षिण आशियाई देशांनी कोणाकडून संरक्षण सामग्री खरेदी करावी, याचा निर्णय त्याच दोन देशांनी घ्यावा. करारांनुसार भारताने अमेरिकेकडून अधिक संरक्षण सामग्री खरेदी करणे अत्यावश्यक आहे. मात्र भारत रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी करत असल्याचे, अमेरिकेचे सहयोगी परराष्ट्रमंत्री अलायस वेल्स यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा उद्देश भारताच्या संरक्षण व्यवहारात मदत करण्याचा आहे आणि संरक्षण व्यवहारात अमेरिका भारताचा सर्वात मोठा सहकारी आहे. रशिया आणि भारतात सुरू असलेल्या व्यवहाराचा परिणाम दोन्ही देशांच्या परस्पर सहकार्यावर होईल, असेही त्यांनी नमूद केले.

अमेरिकेने भारताला एस-४०० ऐवजी पॅट्रियॉट -३ या क्षेपणास्त्राची खरेदी करण्याची ऑफर दिली होती. अमेरिका भारताला हाय अल्टीट्यूड एरिया डिफेन्स आणि पेट्रियॉट-३ ची विक्री करू इच्छीत असल्याचे संकेतही यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने दिले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या विस्तृत चर्चेनंतर भारत आणि रशियामध्ये ५ अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला होता. यामध्ये एस-४०० क्षेपणास्त्रांच्या खरेदीचाही सहभाग आहे.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x