5 November 2024 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News
x

पेगासस प्रोजेक्ट | राफेल वाद उफ़ाळताच हेरगिरीच्या यादीत अनिल अंबानी व माजी CBI प्रमुखांचे नंबर गेले

Pegasus hacking

मुंबई, २३ जुलै | भारतात पाळत ठेवण्यासाठी निवडण्यात आलेले फोन नंबर फक्त पत्रकार, नेते व सामाजिक कार्यकर्त्यांपुरते मर्यादित नव्हते. केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकही टार्गेटवर होते. इस्रायली कंपनी एनएसओचे हेरगिरी साॅफ्टवेअर पेगाससबाबत नवे गौप्यस्फोट करणाऱ्या १० देशांच्या १७ माध्यम संस्थांनी ‘फॉरबिडन स्टोरीज’च्या हवाल्याने गुरुवारी खुलासा करत सांगितले की, भारताचे माजी सीबीआय प्रमुख आलोक वर्माही हेरगिरीचे टार्गेट होते. २०१८ मध्ये त्यांना पदावरून हटवल्याच्या काही तासांतच त्यांचा फोन नंबर पेगाससच्या यादीत टाकण्यात आला. इतकेच नव्हे तर राफेल कराराशी संबंधित उद्योगपती अनिल अंबानी व त्यांच्या कंपनीशी संबंधित लाेकांचे नंबरही पेगाससच्या यादीत टाकले होते.

‘फॉरबिडन स्टोरीज’नुसार, आलोक वर्मा यांच्या कुटुंबातील सदस्यांचे ८ फोन नंबर पेगाससच्या देखरेख टार्गेटच्या यादीत टाकण्यात आले होते. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या टेक लॅबने त्याला दुजोरा दिला आहे. पेगाससच्या निशाण्यावरील ५० हजार नंबर्सच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट शेकडो भारतीय नंबर्सची पडताळणी झाली आहे. गुरुवारी त्याचा एक वृत्तांत समोर आला. त्यात नवे गौप्यस्फोट करण्यात आले.

आलोक वर्मांना राफेल कराराशी संबंधित फाइल दिली होती नंतर…?
आलोक वर्मांना हटवले जाण्याच्या तीन आठवडे आधी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरींनी त्यांची भेट घेतली होती. वर्मांना राफेल कराराशी संबंधित एक फाइल देत चौकशीची मागणी केली होती. तथापि, वर्मांनी एफआयआर दाखल करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू केली नव्हती. पण वर्मा राफेल प्रकरणाची चौकशी सुरू करू शकतात, अशी जोरदार चर्चा होती.

वर्मांव्यतिरिक्त त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाच्या खासगी नंबरचाही पाळत ठेवण्याच्या यादीत समावेश झाला. वर्मांचा एक नंबर टाकल्यानंतर एक तासानेच सीबीआयचे दोन इतर वरिष्ठ अधिकारी राकेश अस्थाना आणि ए. के. शर्मांचे नंबरही यादीत समाविष्ट करण्यात आले. वृत्तानुसार अस्थाना, शर्मा, वर्मा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे काही काळासाठीच लीड डेटाबेसमध्ये आली. २०१९ मध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वर्मांच्या निवृत्तीबरोबरच त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नंबर पाळत यादीतून हटवले होते. वर्मा, शर्मा आणि अस्थानांनी पेगासस प्रोजेक्टच्या खुलाशांवर आतापर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Anil Ambani and former CBI chief were added to the list of spies during Rafael controversy news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x