6 January 2025 5:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

अनिल अंबानी कंपनीचे मुख्यालय येस बँकेच्या ताब्यात जाणार

Anil Ambani, Company headquarter, YES Bank

मुंबई, ३१ ऑक्टोबर: अनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहाचे मुंबईतील मुख्यालय ‘रिलायन्स सेंटर’चा ताबा घेण्याची प्रक्रिया येस बँकेने सुरू केली आहे. हे मुख्यालय विकून टाकणे अथवा आपले कार्यालय तेथे हलविणे असे दोन पर्याय बँकेसमोर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जुलै महिन्यात येस बँकेने या विशाल संकुलनाचा प्रतीकात्मक ताबा घेतला होता. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेले हे संकुल मुंबई विमानतळाच्या दृष्टिपथात आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे येस बँकेचे २,८९२ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. सारफाएसी कायद्यान्वये कारवाई करताना बँकेने या इमारतीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन महिन्यांची आगावू नोटीस देऊन मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार या कायद्यान्वये बँकांना मिळाला आहे.

खासगी क्षेत्रातील बँक ‘येस बँके’नं अनिल अंबानी यांच्या मुंबईतील सांताक्रुज परिसरातील मुख्यालयासाठी नोटीस ऑफ पझेशन पाठवलं होती. तसंच या मुख्यालयाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील रिलायन्सच्या अन्य दोन कार्यालयांसाठीदेखील ही नोटीस पाठवण्यात आली होती. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावर सर्व बँकांचं १२ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. जे फेडण्यास ते असमर्थ ठरले आहेत.

 

News English Summary: Reliance Center, the Mumbai headquarter of Anil Ambani’s Reliance Group, will soon be taken over by Yes Bank. The private lender has started the takeover process and is planning to either sell the property or turn it into an office. Yes Bank had taken ‘symbolic possession’ of Reliance Center after the company failed to repay dues worth Rs 2,892 crore in July. The Anil Ambani-led group is one of the biggest borrowers of YES Bank, with an exposure of over 12,000 crore. The center is located off the Western Express Highway and situated near the Mumbai airport.

News English Title: Anil Ambanis group headquarter will be taken over YES Bank News updates.

हॅशटॅग्स

#AnilAmbani(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x