24 November 2024 9:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मोदींनी जाहीर केलेल्या लॉकडाऊन वेळी न पडलेले प्रश्न अनमोल अंबानींना राज्यातील निर्बंधांनंतर पडू लागले

Anmol Anil Ambani, mini lockdown, Political rally

मुंबई, ६ एप्रिल: कोरोना रुग्णांच्या वाढीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याक कडक निर्बंध आणले आहेत. पण, महाराष्ट्रातील याच लॉकडाउनमुळे देशाला 40 हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक परिणाम ट्रेड, हॉटेल आणि ट्रांसपोर्ट सेक्टरवर पडेल. हा अंदाज केअर रेटिंग एजंसीने व्यक्त केला आहे.

रेटिंग एजंसी केअरने म्हटले की, इकोनॉमिक अॅक्टिव्हिटीमध्ये 0.32% घट होऊ शकते. एका आठवड्यांपूर्वी याच एजंसीने GDP ग्रोथ कमी होऊन 10.7 ते 10.9% होईल, असे म्हटले होते. यापूर्वी ही ग्रोथ 11 ते 12% होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 60 % रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यात सोमवारी 57 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील मिनी लॉकडाऊनवर अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांनी ताशेरे ओढले आहेत. “राजकीय नेते रॅलीचं आयोजन करत आहेत आणि चित्रपटांचं शुटिंगही सुरू आहे. पण उद्योगांवर कठोर निर्बंध लादले आहेत”, असं खोचक ट्विट अनमोल अंबानी यांनी केलं आहे. थेट अंबानी कुटुंबातून लॉकडाऊनवर टीका झाल्यानं याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांना सुरुवात झाल्यानंतर अनमोल अंबानी यांनी एक ट्विट केलं आहे. “अत्यावश्यक सेवा म्हणजे नेमकं काय? कलाकार शुटिंग करत आहेत. राजकीय नेते मोठ्या संख्येनं रॅली करत आहेत. पण तुमचा उद्योग आणि काम हे अत्यावश्यक नाही! प्रत्येक व्यक्तीला त्याचं काम अत्यावश्यक असतं”, असं ट्विट अनमोल अंबानी यांनी केलं आहे.

अनमोल अंबानी यांना हेच प्रश्न मोदी सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या लॉकडाऊनवेळी पडलेले नव्हते हे विशेष. तसेच महाराष्ट्र केवळ पंढपूरची पोटनिवडणूक सुरु आहे आणि तेथेही बंधनं आहे. मात्र ज्या राजकीय नेत्यांच्या रॅलीबद्दल ते बोलत आहेत त्यात त्यांना पश्चिम बंगाल, आसाम, केरळ तसेच तामिळनाडू येथील रॅली दिसत नसावी अशी शक्यता आहे.

 

News English Summary: Anmol Ambani has a tweet. What exactly is essential service? Artists are shooting. Political leaders are rallying in large numbers. But your industry and work is not essential! Everyone needs their work,” tweeted Anmol Ambani.

News English Title: Anmol Anil Ambani criticised over decision on mini lockdown news updates.

हॅशटॅग्स

#AnilAmbani(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x