22 November 2024 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ऑटोमेशनमुळे जगभरात करोडो नोकऱ्या जाणार | स्वतःला अपग्रेडेड ठेवा अन्यथा...

Artificial intelligence, automation, Unemployment

नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर : भारतात नोटाबंदी आणि जीएसटी लागू झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच देशात करोना विषाणूचा शिरकाव झाला. त्यानंतर मार्च २०२० पासून अद्यापपर्यंत अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. पाच महिन्यांच्या लॉकडाउनमुळे जीडीपीचा दर मायनसमध्ये पोहोचला. जो आपला शेजारील देश बांगलादेशच्या जीडीपीपेक्षाही खाली गेला. त्याचबरोबर सप्टेंबर २०२० ची बेरोजगारीची आकडेवारीही समोर आली. यामध्ये देशातील बेरोजगारीचा दर हा ६.६७ टक्के नोंदवण्यात आला आहे. सध्याच्या ताज्या बेरोजगारीच्या आकडेवारीकडे पाहता ४५ वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी असल्याचं समोर आलं आहे.

कोरोना आपत्तीपूर्वीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या २०१८ मधील अहवालानुसार ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे मनुष्य करू शकेल अशी अनेक कामं मशिन्सच्या माध्यमातून होतील आणि त्यामुळे कोट्यवधी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील आणि बेरोजगार होण्याची वेळ येईल. अगदी अकाउंटिंग, ड्रायव्हर, डाटाएंट्री पासून ते थेट रिसेप्शन आणि शॉपिंगसारखी असंख्य कामं ही भविष्यात आता मशिन्सच्या माध्यमातूनच होणार आहेत. या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे चुकांची शक्यताही जवळपास संपुष्टात येते तसेच उत्पादकताही वाढते. त्यामुळं कोणतीही छोटी मोठी मनुष्य आधारित कामं तसेच उच्च दर्जाची काम सुद्धा याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे होणार आहेत.

त्या अहवालात सूचित करण्यात आल्याप्रमाणे पुढील ७ वर्षांमध्ये मनुष्याची अर्ध्यापेक्षा अधिक कामं म्हणजे जवळपास अंदाजे ५२ टक्के कामं ही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्स करतील. सध्या मनुष्याच्या एकूण कामांपैकी केवळ २९ टक्के कामं ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्स करतात आणि प्रमाण भविष्यात थेट ५२ टक्क्यांवर जाणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्समुळे अगदी डॉक्टर्स, प्राध्यापक, पत्रकार, टेक्नेशियन्स, व्हेंडर्स, ऑपरेटर्स, विश्लेषण करणारे तज्ज्ञ, व्हिडीओ एडीटर्स, कॅमेरामन्स अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी जाण्याचा मोठा धोका भविष्यात आहे. त्यामुळे उद्योगांची वेतनावर होणारी प्रचंड अर्थशक्ती बचत होणार आहे. त्यामुळे केवळ जगभरातीलच नव्हे तर भारतातील अनेक दिग्गज कंपन्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर प्रचंड गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असून कामगार, पगार आणि कर्मचाऱ्यांना द्याव्या लागण्याच्या सुविधा या पासून स्वतःची सुटका करण्यासाठी घेण्यासाठी आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी मालकांनी गुणतवणूक खर्ची घालण्याचे निर्णय घेतले आहेत.

त्यात आता कोरोनाच्या संकटामुळे आधीच करोडो लोकांच्य़ा नोकऱ्या, रोजगार गेला असताना आता आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. कोरोनामुळे कर्मचाऱ्यांची उणीव भासल्याने मोठमोठ्या कंपन्यांनी अॅटोमेशनला प्राधान्य दिले आहे. यामुळे जगभरातील तब्बल 85 दशलक्ष नोकऱ्या संपुष्टात येणार आहेत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (World Economic Forum WEF) केलेल्या पाहणीमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मध्यम ते मोठ्या कंपन्यांनी पुढील पाच वर्षांत त्यांचे काम रोबोटवर करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. जगभरातील मोठमोठ्या 300 कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला. या कंपन्या त्यांचे काम डिजिटलायझेशन आणि नवीन अॅटोमेशनवर हलविण्याच्या तयारीला लागल्या आहेत.

आता सध्याच्या कर्मचाऱ्यांना या नव्या प्रणालीवर काम करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, स्कील्स आत्मसात करावे लागणार आहेत. यासाठी त्यांना पैसाही खर्च करावा लागणार आहे. हा एकप्रकारचा कोरोना संकटाचा साईड इफेक्टच आहे. हा अहवाल अशावेळी आला आहे, जेव्हा या कंपन्यांचे लाखो कर्मचारी घरातून काम करूनही कंपन्यांना कर्मचारी कपात करावी लागली होती, असे WION ने म्हटले आहे.

कंपन्या डेटा एंट्रीच्या कामासाठी लोकांऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे रोजगार निर्मिती ठप्प आणि नोकरी नष्ट होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मुळे 97 दशलक्ष नोकऱ्या उपलब्ध होत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांना नवनवीन स्किल शिकावी लागणार आहे. हे एक मोठे आव्हान असणार आहे.

 

News English Summary: With the Corona crisis already costing millions of jobs, another shocking fact is emerging. Due to the shortage of staff due to Corona, large companies have given priority to automation. This will result in the loss of 85 million jobs worldwide. A survey by the World Economic Forum (WEF) has revealed this shocking fact. Medium to large companies have started moving to do their work on robots in the next five years. The largest 300 companies around the world were studied. These companies are preparing to move their work to digitization and new automation.

News English Title: Artificial intelligence automation implementation will increase unemployment news updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x