13 November 2024 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

देशात कोरोनाच्या 2.5 कोटी केसेस, आयुष्मान कार्डद्वारे केवळ 4 लाख रुग्णांना उपचार, केंद्राची योजना अपयशी

India corona pandemic

नवी दिल्ली, २० मे | भारतात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रचंड थैमान घातले आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही नव्या कोरोना रुग्णांचे आकडे वाढताना दिसत आहे. त्यामुळे भारतात दुसऱ्या लाटेचा पीक पॉईंट येऊन गेला किंवा नाही, यावरुन बरीच मतमतांतरे आहेत. अशातच आता देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार, याचे अंदाज बांधण्याचे काम सुरु आहे.

एखाद्या साथीच्या रोगाची तीव्रता मोजण्यासाठी लाट, पीक पॉईंट अशा संज्ञांचा वापर केला जातो. एका विशिष्ट कालावधीत रुग्णांची संख्या अचानक वाढली तर तो पीक पॉईंट समजला जातो. हा टप्पा पार केल्यानंतर रुग्णांची संख्या कमी होण्यास प्रारंभ होतो. सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पीक पॉईंट येऊन गेला आहे किंवा नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे देशभर रुग्णांची इस्पितळांमध्ये रांग लागत आहेत.

दरम्यान, आयुष्मान भारत ही केंद्र सरकारची महत्त्वांक्षी योजना आहे. या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि मोदी केअर योजना म्हणूनही ओळखले जाते. देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येते.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. ज्याअंतर्गत गरीब कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी विमा कार्ड बनविले जाते आणि पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाते. भारतातील वीस हजारांहून अधिक रुग्णालये या योजनेशी जोडलेली आहेत. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या योजनेत एक हजारांहून अधिक आजारांचा समावेश आहे. या योजनेचे दोन भाग आहेत ज्या अंतर्गत गरीबांना आरोग्य विमा दिला जातो आणि आरोग्याची पायाभूत सुविधा मजबूत केली जाते. या रिपोर्टमध्ये आम्ही आरोग्य विम्यावर बोलत आहोत.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानुसार, 16 मे रोजी देशात 12377 नवीन आयुष्मान कार्ड तयार केले गेले. यावर्षी 16 मे पर्यंत देशात एकूण 15.89 कोटी आयुष्मान कार्ड देण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 1,74,44,899 हॉस्पिटल अॅडमिशनची नोंद झाली आहे.

उत्तर प्रदेशात एकूण 1,16,84,453 कुटुंबे PMJAYअंतर्गत नोंदणीकृत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानांतर्गत अतिरिक्त 8,43,876 कुटुंबांची नोंद झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील 39% कुटुंबांचा या योजनेत समावेश आहे. यावर्षी एप्रिल 2021 पर्यंत उत्तर प्रदेशात PMJAY अंतर्गत 7,05,904 रूग्णालयात दाखल झाले असून एकूण 7,35,76,26,345 रुपये खर्च झाले आहेत, परंतु या योजनेंतर्गत किती कोविड रूग्णांवर उपचार केले गेले आहेत? किती खर्च झाला हा डेटा स्वतंत्रपणे उपलब्ध नाही.

मध्य प्रदेशात ही योजना आयुष्मान भारत मध्य प्रदेश नवनिर्माण योजना या नावाने चालू आहे. सरकारचा असा दावा आहे की, राज्यातील 74% कुटुंबे या योजनेखाली येतात. यावर्षी मध्य प्रदेशात आतापर्यंत 7,54,419 हॉस्पिटल अॅडमिशन या योजनेअंतर्गत झाले आहेत, ज्यावर सरकारने 10 अब्ज रुपयांहून अधिक (10,45,48,49,434) खर्च केले आहेत. मध्य प्रदेशातही कोविड रूग्णांचा या योजनेअंतर्गत लाभ घेतल्याचा डेटा स्वतंत्रपणे उपलब्ध नाही. राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाबच्या पीएमजेवाय योजनेचा डेटा वेबसाइटवर उपलब्ध नाही.

भारत-PMJAY(आयुष्मान कार्ड) अंतर्गत कोविडवर किती लोक उपचार घेत आहेत याची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नाही. जेव्हा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) च्या अधिका-यांशी याबाबत बोलले गेले, तेव्हा ते म्हणाले की, अद्याप डेटा गोळा करण्यात आलेला नाही, कारण मागील वर्षीपासून कोविड सतत चालू आहे.

आता रुग्णालयात या योजनेच्या कार्डद्वारे पेमेंट करता येता का? हा प्रश्न उपस्थित राहतो. आरोग्य हा राज्याचा विषय असून केंद्र सरकारने राज्यांना PMJAY अंतर्गत पॅकेजेस आणि दर ठरविण्याचा अधिकार दिला आहे. उदाहरणार्थ, गुजरातमधील कोविड उपचारासाठी जनरल वॉर्डसाठी 2000 रुपये, हाय डेंसिटी युनिट बेडसाठी 3000 रुपये, आयसीयू (व्हेंटिलेटरशिवाय) 4000 रुपये आणि आयसीयू (व्हेंटिलेटरसह) प्रति दिवस 5000 रुपये दराने आकारले जाऊ शकतात. हरियाणामध्येही तेच दर आहेत, पण हरियाणा सरकारने पीपीई किटसाठी वीस टक्के अधिक दर देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आयसीयू बेडसाठी दिवसाला 6 हजार रुपयांपर्यंत पैसे दिले जाऊ शकतात.

तज्ज्ञ काय म्हणतात?
शासकीय दर कमी असल्याने खासगी रुग्णालयांनी रुग्णांना कोविड -19 च्या सेवा पुरविल्या नाहीत, असे आरोग्य तज्ज्ञ चंद्रकांत लहरिया यांचे मत आहे. लहरीया म्हणतात, “डेटा उपलब्ध नाही, परंतु माझ्या माहितीनुसार, PMJAY अंतर्गत खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांवर उपचार केले नाहीत कारण सरकारचे दर फारच कमी आहेत. आयसीयू बेडसाठी फक्त 5000 रुपये निश्चित होते. या योजनेअंतर्गत ज्या रूग्णांवर उपचार केले गेले असतील, त्यांच्यापैकी बहुतांश रूग्णांवर शासकीय रूग्णालयात उपचार झाले असावेत.’

यावर्षी एप्रिलपर्यंत देशभरातील चार लाख कोविड रूग्णांवर पीएमजेवाय अंतर्गत उपचार केले गेले, असे आयुष्मान भारतच्या सीईओंचे म्हणणे आहे. त्यानुसार हा आकडा अतिशय कमी आहे. डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात की, ही संख्या चार लाखांहून दहा लाख जरी झाली असेल, तरीही एकुण कोविड रुग्णांच्या प्रमाणाच फारच कमी आहे.’ आतापर्यंत देशात कोरोना संसर्गाची सुमारे अडीच कोटी प्रकरणे नोंदली गेली आहेत.

कोविड साथीच्या काळात PMJAY ही योजन यशस्वी न होण्याचे कारण म्हणजे कोणतीही योजना एखाद्या विशिष्ट वर्गासाठी असेल आणि इम्पॅनलमेंट बेसवर काम करते तेव्हा लोकांना त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. कोविड दरम्यान लोकांची गरज होती की त्यांची चाचणी घराजवळ असावी, रुग्णालय घराजवळ असावे, हे या योजनेंतर्गत करता आले नाही.

कोविड साथीच्या काळात रुग्णालये भरलेली होती, लोकांना बेड मिळविणे शक्य नाही. म्हणूनच लोकांची प्राथमिकता या योजनेअंतर्गत उपचार मिळावे ही नसून रुग्णांना तातडीने उपचार मिळावे ही होती. आपत्कालीन परिस्थितीत ही योजना अपयशी ठरल्याचे दिसून येते. देशात आरोग्य आणीबाणी आहे. म्हणूनच कोणत्याही योजनेचा निर्णय आरोग्य आणीबाणीच्या काळात ती प्रभावी नव्हती, यावर घेतला जाऊ नये. यातून जो धडा घ्यायला हवा तो म्हणजे आरोग्य आणीबाणीच्या काळात ही महत्वाकांक्षी योजना अपयशी ठरली. ज्या गरीबांसाठी ही योजना बनवण्यात आली होती, त्यांना त्याचा फायदा मिळू शकला नाही.’

 

News English Summary: Ayushman Bharat is an ambitious plan of the Central Government. This scheme is also known as Pradhan Mantri Jan Arogya Yojana and Modi Care Yojana. The objective of the scheme is to provide health insurance to the economically weaker people in the country. Up to Rs 5 lakh cashless health insurance is provided under this scheme for every financially weak family.

News English Title: Ayushman Bharat Health scheme failed during corona pandemic in India news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x