30 April 2025 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

केंद्र सरकारने कोरोनाऐवजी अर्थव्यवस्थेचा आलेखच खाली आणला - उद्योगपती राजीव बजाज

Rajeev Bajaj, Coronavirus Lockdown, Rahul Gandhi Webinar

नवी दिल्ली, ५ जून: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाया गेला, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. ते गुरुवारी उद्योगपती राजीव बजाज यांच्यासोबत झालेल्या वेबसंवादात बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, सध्याची परिस्थिती पाहिल्यास लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुमच्या लक्षात येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशी परिस्थिती असणारा भारत जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे आपण पुन्हा आहे तिथेच आलो आहोत. आता केंद्र सरकार सर्व काही राज्यांवर ढकलून हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली.

जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले होते. मात्र, भारतात तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्राच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे.

यावेळी त्यांनी देशातील उद्योगपती आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान बजाज यांनी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनवरही टीका केली. “तुम्ही करोनाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आणला,” असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

“भारतानं शेजाऱ्यांकडून शिकण्याऐवजी पाश्चिमात्यांच अनुकरण केलं. त्यांची भौगोलिक स्थिती, अन्य परिस्थिती आणि तापमान यांसारख्या गोष्टी निराळ्या आहे. आपण कठोर लॉकडाउन लागू करण्याचा प्रयत्न केला. परंतु तसं करता आलं नाही. यामुळे मात्र अर्थव्यवस्थेवर मात्र मोठा परिणाम झाला. कोरोनाच्या आलेखाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आला,” असं म्हणत बजाज यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

“भारताला जपान किंवा स्वीडनप्रमाणे पाऊल उचलणं अपेक्षित होतं. ते हर्ड इम्युनिटीच्या मार्गावर पुढे गेले. याचा अर्थ असा नाही की त्यांनी ज्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक होता त्यांना मरण्यासाठी सोडून दिलं. याचा अर्थ असा आहे की सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं असा होता. आपल्याकडे दुर्देवानं पूर्ण लॉकडाउन राबवलाच गेला नाही,” असं ते म्हणाले.

 

News English Summary: Rahul Gandhi interacted with Rajiv Bajaj, the country’s industrialist and managing director of Bajaj Auto. During the discussion, Bajaj also criticized the lockdown imposed in the country. “You have brought down the graph of the economy instead of the corona,” he said, targeting the central government.

News English Title: Bajaj Auto Managing Director Rajeev Bajaj Criticize Central Government Coronavirus Lockdown Congress Rahul Gandhi Webinar News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या