14 November 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Notice | क्रेडिट कार्ड वापरता, क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी बातमी, थेट इन्कम टॅक्सची नोटीस येईल दारी - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजी वाढणार - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA Horoscope Today | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय - NSE: SUZLON IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC
x

150 कोटी थकवले | भाजप आ. राहुल कुल यांच्या साखर कारखान्याला जप्तीची नोटीस

MLA Rahul Kul

पुणे, २६ ऑगस्ट | पुणे जिल्ह्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याला जप्तीची नोटीस आली आहे. आमदार राहुल कुल यांच्या ताब्यातील भीमा पाटस साखर कारखान्याने पुणे जिल्हा बँकेचे तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. त्यामुळे बँकेने ही नोटीस बजावली आहे.

भीमा पाटस कारखान्याने PDCC बँकेचे 150 कोटी थकवले:
गेल्या दोन वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेचं कर्ज परतफेड करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. पण तीन वर्षांपासून साखर कारखाना बंद असून, सुरु होण्याची काहीच लक्षणे दिसत नसल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दीडशे कोटी थकबाकी वसुलीसाठी भीमा पाटस साखर कारखान्याना जप्तीची नोटीस बजावलीये.

थकीत कर्ज परतफेड त्वरीत न केल्यास कारखाना बँक ताब्यात घेईल अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईमुळे दौंड तालुक्यातील राजकारण पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत. सन 2017 – 2018 पासून भीमा पाटस साखर कारखाना बंद आहे. त्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तब्बल 36 कोटी रुपयांची मदत करण्यात आली. परंतु शासनाची मदत मिळवून देखील कारखान्याचे नेतृत्व करणारे आमदार राहुल कुल कारखाना सुरु करू शकले नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: PDCC bank sent seizes notice to BJP MLA Rahul Kul’s sugar factory.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x